CJP Jantar Mantar Protest : आंदोलनाचे तीव्र पडसाद; रेल्वे सेवेवर परिणाम, विमान तिकीट दरात मोठी वाढ, नागरिक बेहाल

CJP Jantar Mantar Protest : सीजेपीच्या (CJP) निदर्शनांमुळे दिल्लीत कडक निर्बंध आणि अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. अशात विमानांच्या ऐन वेळी लास्ट मिनिट होणाऱ्या बुकिंगमध्ये किंचित वाढ झाली आहे. काही मार्गांवर विमानाचे तिकीट दर देखील वाढले आहेत.

CJP Jantar Mantar Protest : आंदोलनाचे तीव्र पडसाद; रेल्वे सेवेवर परिणाम, विमान तिकीट दरात मोठी वाढ, नागरिक बेहाल
CJP Jantar Mantar Protest
| Updated on: Oct 10, 2026 | 10:34 AM

दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ने नियोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर दिल्ली पोलीस आणि ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षा कर्मचारी स्थानक परिसरात गस्त घालत आहेत आणि संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जात आहे. दिल्ली येथील वातावरण सध्या तापलेलं आहे. सीजेपीच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद वाहतुकीवर होत असल्याचं दिसत आहे. अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे विमान तिकीटांचे दर देखील वाढवण्यात आले आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, CJP आंदोलनामुळे दिल्लीत कडक निर्बंध आणि अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे, येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांच्या ऐन वेळी होणाऱ्या बुकिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर काही मार्गांवर विमान तिकीट दर देखील वाढले आहेत. ट्रॅव्हल इंडस्ट्रीच्या सूत्रांनुसार, जर आंदोलन आणि प्रवासावरील निर्बंध लांबले, तर नवरात्रीच्या सणासुदीच्या सुरुवातीला तिकीट दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

Loading...

एअरलाइन अधिकाऱ्याने सांगितले की, या वीकेंडला दिल्लीच्या विमानांच्या बुकिंगमध्ये किंचित वाढ झाली आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, शुक्रवार रात्रीपर्यंत लखनऊ, प्रयागराज आणि उत्तर प्रदेशच्या इतर भागांमधून येणाऱ्या ‘स्पॉट फेअर’मध्ये कोणतीही मोठी वाढ दिसून आलेली नाही. केवळ वाराणसी-दिल्ली मार्गावर शनिवारचे स्पॉट भाडे एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी जास्त होते. वाराणसी-दिल्लीचे वन-वे भाडे 6,200 रुपयांपासून सुरू होऊन 14 हजार रुपयांपर्यंत पोहोचले, जे सामान्यपेक्षा जास्त आहे.

अमृतसरहून विमानभाडे शुक्रवारी बऱ्यापैकी वाढले. काही विमानांचे भाडे 8 हजार रुपयांपर्यंत पोहोचले, तर सामान्य वन-वे भाडं जवळपास 4 हजार रुपयांपर्यंत असतं. लुधियानाहून शनिवारच्या विमानाचं भाडं दिवसभरात कमी-जास्त होत राहिलं आणि एका वेळी ते 12 हजार 987रुपयांपर्यंत पोहोचले.

मेट्रो सेवेतील मोठ्या प्रमाणातील अडथळे आणि ट्रॅफिक विस्कळीत होण्याच्या शक्यतेमुळे प्रवासी, क्रू आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर विमानतळावर पोहोचणं ही एअरलाइन्स आणि दिल्ली विमानतळाची सर्वात मोठी चिंता आहे. अशात जर मागणी वाढली, तर विमानभाडे आणखी वर जाऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us