AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचा नवा डाव, थेट नवा मोर्चा, एका पोस्टने खळबळ!

CJP: कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता ही नवी पोस्ट आहे तरी काय? जाणून घ्या...

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचा नवा डाव, थेट नवा मोर्चा, एका पोस्टने खळबळ!
Abhijit DipkeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 5:20 PM
Share

नीट पेपर लीक प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन केले. देशभरातून लाखो विद्यार्थी येथे जामा झाले आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. शेवटी शिक्षामंत्र्यांचा राजीनामा झाल्या. त्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी थेट उत्तर प्रदेशमध्ये मोर्चा काढला आहे. हा मोर्चा का काढण्यात आला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने रामपूरमधील जौहर युनिव्हर्सिटी पाडण्याचा आदेश दिला आहे. याबाबत सीजेपीने मोर्चा काढत, हे देशासाठी योग्य नाही असे म्हटले आहे. कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘देशात तर असेच रिपोर्ट्सनुसार दररोज सुमारे २० शाळांपेक्षा जास्त शाळा बंद होत आहेत. अशा स्थितीत उत्तर प्रदेशात युनिव्हर्सिटी पाडणे म्हणजे शिक्षेला चिरडण्यासारखा निर्णय असेल, जो या देशासाठी अजिबात योग्य ठरणार नाही.’ सीजेपीच्या वतीने असेही म्हटले गेले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने या निर्णयाचा पुन्हा विचार करावा आणि हा आदेश मागे घ्यावा.

रामपूर प्रशासनाने इमारती अवैध ठरवल्या

समोर आलेल्या माहितीनुसार, रामपूर विकास प्राधिकरणाने युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील ४० पैकी ३८ इमारती अवैध ठरवल्या आहेत. या इमारतींचे बांधकाम अवैध मानून त्यावर बुलडोझर फिरवण्याच्या कारवाईचा आदेश जारी केला आहे. रामपूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, संस्थेला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर ते अवैध बांधकाम काढून टाकले नाही, तर रामपूर विकास प्राधिकरण स्वतःच्या स्तरावर पाडण्याची कारवाई करेल. रामपूर प्रशासनाने केलेल्या या कारवाईला समाजवादी पार्टी विरोध करत आहे.

सीजेपीने जंतर-मंतरवर केला होता निषेध

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या टिप्पणीनंतर स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपर लीकची जबाबदारी आणि आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर निषेध करण्यासाठी आंदोलन केले. याचे प्रमुख चेहरे सोनम वांगचुक होते, पण आयोजक अभिजीत दीपके होते, जे सीजेपीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाची मागणी सरकारने मान्य केली आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षामंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा