AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय जमिनीवर चीनचा कब्जा, बॉर्डरवर धक्कादायक घडामोडी, थेट चीनींनी..

भारत आणि चीन यांच्यात कायमच मोठा सीमावाद राहिला. त्यामध्येच अरुणाचल प्रदेश हा वादाचा मुद्दा राहिला. चीन कायमच अरुणाचल प्रदेश आपला असल्याचा दावा करतो. यादरम्यानच आता भारतात खळबळ उडवणारी माहिती पुढे आली.

भारतीय जमिनीवर चीनचा कब्जा, बॉर्डरवर धक्कादायक घडामोडी, थेट चीनींनी..
India China Border
| Updated on: Jun 29, 2026 | 12:20 PM
Share

भारत आणि चीन यांच्यातील सीमा वाद आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद आहे. मोठी झडप देखील काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन सीमेवर झाली. थेट खोल नदीत सैनिक फेकून देण्यात आले. दगडे एकमेकांच्या सैन्यावर फेकण्यात आली. यादरम्यानचे काही धक्कादायक व्हिडीओही व्हायरल झाले होते. यादरम्यानच आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरून भारतासाठी अत्यंत वाईट बातमी पुढे येत आहे. भारतीय जमिनीवर चीनने कब्जा केला आहे. सुबनसिरी जिल्ह्यातील स्थानिक नाह आदिवासी समुहाने दावा केला की, चीन त्यांच्या जमिनींवर कब्जा करत आहे. त्यांनी म्हटले की, नियंत्रण रेषा अर्थात एलओसीजवळ चीनच्या सैन्याने भारतीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात कब्जा केला. आदिवासी संघटना नाह वेलफेअर सोसायटीने जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ह वेलफेअर सोसायटीने दावा केला की, मागच्या 6 वर्षात चीन सैन्य त्यांच्या पूर्वजांच्या असलेल्या जमिनींवर कब्जा करत आहे. चीनचे सैन्य गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हळूहळू करून पुढे पुढे सरकत आहे. मात्र, 2020 पासून त्यांनी अधिक प्रगती पथावर भारताच्या जमिनीवर कब्जा करण्यास सुरूवात केली. नाह वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष केरू चादर यांनी धक्कादायक दावा केला.

त्यांनी म्हटले की, आमचे भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. ते आमच्या जमिनीचे रक्षण करत आहेत. मात्र, ताक्सिंग क्षेत्रात चीनी पीएलए अ्त्यंत वेगाने पुढे सरकत आहेत. हे अत्यंत घातक आहे. प्रत्येक दिवशी आमची जमीन चीनच्या ताब्यात जात आहे. भारतीय जमिनीवर चीन रस्ते आणि त्यांचे सैन्य कॅम्प तयार करत आहे. भारतासाठी अरुणाचल प्रदेश हा महत्वाचा भाग आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करतो.

अरुणाचल प्रदेशमधील अनेक गावे आपल्या नकाशात दाखवतो. त्यामध्येच आता भारतीय जमिनीवर कब्जा चीनकडून करण्यात आल्याचे सांगितले जातंय. त्यामध्येच आता चीनकडून थेट भारतीय जमिनीवर कब्जा केला जात असल्याने मोठी खळबळ उडाली. आता भारतीय सैन्य यावर नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ज्यामुळे चीन आणि भारत यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढू शकतो.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ