AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात मोठा ट्विस्ट, इमरान खान तडजोडीला तयार? थेट आसिम मुनीर यांच्याशी…

पीटीआयने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगातून रुग्णालयात हलवल्यानंतर लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबाबतच्या भूमिकेत मोठा बदल दर्शवला आहे. इम्रान खान यांची सुटका झाल्यास आम्ही लष्करप्रमुखांशी संघर्ष करणार नाही, असे पीटीआयच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. हा बदल पाकिस्तानच्या राजकारणातील सेना आणि इम्रान खान यांच्यातील वाद संपुष्टात येण्याचे संकेत देत आहे. देशाचे हित सर्वोच्च असल्याचे पीटीआयने स्पष्ट केले.

पाकिस्तानात मोठा ट्विस्ट, इमरान खान तडजोडीला तयार? थेट आसिम मुनीर यांच्याशी...
imran khanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2026 | 11:37 AM
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना तुरुंगातून रुग्णालयात शिफ्ट केल्यानंतर पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. जर इमरान खान यांची तुरुंगातून सुटका झाली तर आम्ही आर्मी चीफ आसिम मुनीर यांच्याविरोधात कोणतीही भूमिका घेणार नाही, असं पीटीआयचे प्रवक्ते जुल्फिकार बुखारी यांनी म्हटलं आहे. इमरान खान यांना तुरुंगातून रुग्णालयात नेण्याचे कोर्टाने आदेश देण्यात आले. इमरान खान यांना तीन दिवस रुग्णालयात ठेवलं. त्यानंतर परत अदियाला तुरुंगात नेण्यात आलं, अशावेळी पीटीआयकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

जुल्फिकार बुखारी यांनी इंग्रजी वृत्तसंस्थेला ही प्रतिक्रिया दिली आहे. इमरान खान यांना जर उद्याच सोडून देण्यात आलं तर देशाचं नुकसान होईल असं आम्ही काहीच करणार नाही. इमरान खान उदारमतवादी विचारांचे नेता आहे. देशाचं हितच त्यांच्यासाठी सर्वोच्च आहे, असं जुल्फिकार बुखारी यांनी म्हटलं आहे.

बुखारी काय म्हणाले?

इमरान खान सैन्य नेतृत्वाशी थेट लढाई करेल असा याचा अर्थ नाही. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यक्तीला आपलं दु:ख, वेदना आणि राग नियंत्रित करावा लागतो, असं बुखारी यांनी म्हटलं. दरम्यान, इमरान खान आणि पाकिस्तानच्या सैन्या दरम्यान दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. 2023मध्ये इमरान खानच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी आर्मी चीफ आसिम मुनीर यांच्या विरोधात सातत्याने निदर्शने केली होती. मुनीर यांच्यामुळेच इमरान खान यांच्या अडचणी वाढल्याचं इमरान समर्थकांचं म्हणणं आहे. स्वत: इमरान खान यांनीही मुनीर यांच्यावर तिखट शब्दात हल्ला चढवला होता.

इमरान तडजोडीला तयार?

पीटीआयकडून आलेल्या या प्रतिक्रियेचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पीटीआयचा मुनीर विरोध मावळल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानचं राजकारणातील सैन्य आणि इमरान खान यांच्यात सुरू असलेला वाद संपुष्टात येण्याचे संकेतही या निमित्ताने मिळत आहेत. मात्र, इमरान खान सैन्य नेतृत्त्वाच्या समोर तडजोडीला तयार आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पाकिस्तानी सरकार आणि सैन्याने बुखारी यांच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सैन्याने यापूर्वीही राजकारणात हस्तक्षेप करत नसल्याचं म्हटलं जात आहे. तर, इमरान खान यांच्याशी सुरू असलेली प्रकरणं कोर्टाशी संबंधित असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...