AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचे टेन्शन वाढले, अभिजीत दिपके यांच्या घरी थेट बैठक, CJP च्या मोठ्या हालचाली, 15 ते 20..

कॉकरोच जनता पार्टीकडून मोठे आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आता अत्यंत महत्वाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तिथेच मोठ्या गोष्टी ठरणार आहेत.

सरकारचे टेन्शन वाढले, अभिजीत दिपके यांच्या घरी थेट बैठक, CJP च्या मोठ्या हालचाली, 15 ते 20..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 02, 2026 | 1:38 PM
Share

जंतर मंतरवरील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची तब्येत खालावली. कालही अभिजीत दिपकेंवर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीला विदेशातून मिळणाऱ्या पैशांसंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. त्यामध्येच अभिजीत दिपकेंचे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर अभिजीत यांना विदेशात पाठवण्यासाठी पैसा कुठून आला आणि याची चाैकशी केली जावी, अशी थेट मागणी करण्यात आली. हेच नाही तर अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिकबाबींचे चाैकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसे पत्रही देण्यात आले. अभिजीत दिपके यांनी नीट पेपरफुटीविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. कॉकरोच जनता पार्टीला देशभरातून प्रतिसाद मिळाला.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके जोरदार चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल झाले. यादरम्यान लोकांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली. आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बुधवारी कॉकरोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार बैठक होणार आहे.

CJP चे कोअर कमिटीचे देशातील 15 ते 20 प्रमुख सदस्या सोबत अभिजित दिपके चर्चा करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील दिपकेंच्या घरात ही बैठक होणार आहे. प्रमुखांना तसा मेसेजही पाठवण्यात आला. CJP चे पुढील ध्येय धोरण, भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे. E20 इंधनाच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टी आवाज उठवणार असल्याची चर्चा आहे.

मंगळवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल E20 इंधनाच्या मुद्द्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतीत निवासस्थानी मोर्चा काढणार आहेत. E20 इंधनाच्या वादात कॉकरोच जनता पार्टी नक्की काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. त्यातच आत महत्वाची बैठक अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांची माफी मागावी असे म्हटले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी