AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांच्या अडचणीत वाढ… कॉकरोच जनता पार्टीने दिला मोठा इशारा

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. त्यामध्येच दिल्लीत घडामोडींना वेग आला. आज आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच कॉकरोच जनता पार्टीकडून मोठे भाष्य करण्यात आले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या अडचणीत वाढ... कॉकरोच जनता पार्टीने दिला मोठा इशारा
cockroach janata party protest
| Updated on: Jul 24, 2026 | 12:03 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू आहे. आज सरकारसोबत चर्चा करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ जाणार आहे. आम्ही चर्चेसाठी कधीही तयार आहोत, तुम्ही वेळ आणि दिवस सांगा असे आवाहन सरकारकडून आंदोलकांना करण्यात आले होते. यासोबतच चर्चेसाठी तब्बल 4 वेळा प्रस्ताव सरकारने आंदोलकांना दिला. मात्र, आंदोलकांनी सरकारसोबत चर्चा न करण्याचा निर्णय घेतला. 26 दिवसांनंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडले. मात्र, कॉकरोच जनता पार्टी अजूनही राजीनाम्यावर ठाम आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जंतर मंतर मैदान सोडणार नसल्याची भूमिका कॉकरोच जनता पार्टीने घेतली. आता शिष्टमंडळ आणि सरकारमधील बैठकीत नक्की काय निर्णय होतो, हे पाहण्यासारखे ठरेल.

यादरम्यानच आता आशुतोष रांका याने सरकारसोबतच्या चर्चेअगोदरच जंतर मंतरवरून मोठे विधान केले. आशुतोष रांकाने म्हटले की, आज 12.30 वाजता आम्ही सरकारसोबत चर्चा करण्यासाठी जाणार आहोत. पण आम्ही स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्हाला हवाबाजी नाही पाहिजे. तुम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. तुम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागेल.

त्याच्याखाली काहीच मान्य नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊनच जंतर मंतरवरून निघणार. सोनम वांगचूक आणि इथे जमलेल्या सर्वांनी आपला जीव धोक्यात घालून इथे सर्वांना जमा केले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सोनम वांगचूक यांचा संघर्ष कधीच विसरणार नाहीत. आता जबाबदारी आमची आहे. आपल्याला इथेच राहायचे आहे आणि लढा द्यायचा आहे, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही.

26 दिवस सोनम वांगचूक उपाशी होते, आपल्याला त्यांच्या संघर्षाला असेच जाऊ द्यायचे नाही. कॉकरोच जनता पार्टी जरी सरकारसोबत चर्चेसाठी तयार झाली असली तरीही त्यांच्याकडून अजूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीमध्ये झालाच पाहिजे, या मुद्द्यावर विरोधकही आक्रमक घेत आहेत. संसदेबाहेर घोषणाबाजी केली जातंय. आज याबाबत फैसला होईल.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच