व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; जाणून घ्या किती झाली किंमत…

नवी दिल्लीः व्यावसायिक गॅस सिलिंडर 36 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. आता दिल्लीत त्याची किंमत 1976 रुपयांवर आली असून त्याआधी त्याची किंमत 2012.50 रुपये होती. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG gas cylinder) किंमतीत आता कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर (Commercial Gas Cylinders) 36 रुपयांनी […]

व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; जाणून घ्या किती झाली किंमत...
| Updated on: Aug 01, 2022 | 8:58 AM

नवी दिल्लीः व्यावसायिक गॅस सिलिंडर 36 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. आता दिल्लीत त्याची किंमत 1976 रुपयांवर आली असून त्याआधी त्याची किंमत 2012.50 रुपये होती. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG gas cylinder) किंमतीत आता कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर (Commercial Gas Cylinders) 36 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत (Delhi) त्याची किंमत 1976 रुपयांवर आली असून त्याचीच या आधी 2012.50 रुपये किंमत होती. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आतापर्यंत दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 2012.50 रुपये, कोलकात्यात 2132 रुपये, मुंबईत 1972.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2177.50 रुपये होती.

सलग चौथ्यांदा किंमत कपात

ही सलग चौथ्यांदा किंमत कपात करण्यात आली आहे. जुलै महिन्यातच त्याची किंमत दोनदा कमी करण्यात आली होती. 19 मे रोजी राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2354 रुपये होती. 1 जून रोजी त्याची किंमत 135 रुपयांनी कमी झाली, त्यानंतर ती 2219 रुपयांपर्यंत खाली आली.

1 जुलै रोजीही किंमतीत कपात

1 जुलै रोजी, किंमत पुन्हा 198 रुपयांनी कमी करण्यात आली आणि त्याची किंमत 2021 रुपये करण्यात आली. 6 जुलै रोजी, किंमत 8.50 रुपयांनी कमी झाली आणि ती 2012.50 रुपयांवर आली.

घरगुती गॅस..

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्याचा दर 1053 रुपये प्रति सिलेंडर आहे.मुंबईची किंमत 1052.50 रुपये आहे. कोलकात्याची किंमत 1079 रुपये आणि चेन्नईची किंमत 1068.50 रुपये प्रति सिलेंडर आहे.