AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारण फिरलं! ‘किंगमेकर’ मुख्यमंत्री इंडिया आघाडीत सामील, या राज्यातील सत्ताधारी पक्षाचा सर्वात मोठा निर्णय

देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही घडामोड घडल्याने आता इंडिया आघाडीचं बळ आणखी वाढणार आहे, नेमकं काय घडलं?

राजकारण फिरलं! 'किंगमेकर' मुख्यमंत्री इंडिया आघाडीत सामील, या राज्यातील सत्ताधारी पक्षाचा सर्वात मोठा निर्णय
Tamil Nadu CM Vijays TVK party joins INDIA allianceImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 8:06 PM
Share

यावर्षी देशाच्या राजकारणाने एक वेगळं चित्र पाहिलं. तामिळनाडूमध्ये थलापती विजयच्या पक्षाने न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विजय मिळवला. निवडणुका जिंकल्यानंतर अभिनेता विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण आता त्यांचा पक्ष टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेट्री कळघम हा INDIA आघाडीत सहभागी झाला आहे. तमिळनाडू काँग्रेस अध्यक्ष मणिक्कम टागोर यांंनी यापूर्वीच याबद्दल माहिती दिली होती.

इंडिया आघाडीमध्ये टीव्हीकेचा अधिकृतपणे समावेश

त्यामुळे आता विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीला नवा सहकारी मिळाला असून अभिनेते विजय यांच्या नेतृत्वातील TVK हा पक्ष INDIA आघाडीत अधिकृतपणे सहभागी झाला आहे.  TVKच्या INDIA आघाडीतील प्रवेशामुळे तमिळनाडूत आघाडी अधिक मजबूत होणार असल्याच वक्तव्य मणिक्कम केलं आहे. CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जिल्हास्तरावर आंदोलन करण्याचा INDIA आघाडीचा निर्णय झालेला आहे. १५ ऑक्टोबरला चेन्नईत INDIA आघाडीतील सर्व ७ पक्षांचे जिल्हास्तरीय आंदोलन होणार आहे. या सगळ्य आंदोलनांना TVK चा पाठिंबा असून त्यामध्ये पक्ष आता पूर्ण ताकदीने प्रत्यक्ष सहभागी होणार आहे. पक्षाच्या समावेशाचा ठरावही सर्वांच्या समंतीने मंजूर झाल्याची माहितीही समोर आली आहे, याबद्दलचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

विजय यांनी विधानसभेचं मैदान गाजवलं

दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालात अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने १०८ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवले आहे. आपल्या पहिल्याच निवडणुकीत टीव्हीके (TVK) हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. एकूण २३४ जागांपैकी TVK पक्षाने १०८ जागा जिंकल्या. पण ते बहुमताच्या आकड्यापासून (११८ जागा) फक्त १० जागा दूर राहिले आणि राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती.

काँग्रेस आणि इतर डाव्यांचा पाठींबा

त्यानंतक बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यासाठी त्यांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज होती. यावेळी त्यांच्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्ष धावून गेले. त्यांनी दिलेल्या याच पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने विधानसभेतील बहुमत चाचणी सहज पार केली आणि विजय मुख्यंत्री म्हणून सध्या राज्याचा कारभार हाकत आहेत.

Follow Us
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा