काँग्रेस खासदार किर्ती पी.चिंदबरम यांचे ट्वीट चर्चेत, तामिळनाडू सरकारला भाजपाशासित राज्याकडून शिकण्याचा दिला सल्ला

तामिळनाडूच्या बिघडत्या परिस्थितीवर टीका करताना काँग्रेस खासदाराने वेस्ट मॅनेजमेंट शिकण्यासाठी इंदूरला जाण्याचा सल्ला दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेस खासदार किर्ती पी.चिंदबरम यांचे ट्वीट चर्चेत, तामिळनाडू सरकारला भाजपाशासित राज्याकडून शिकण्याचा दिला सल्ला
| Updated on: Mar 25, 2025 | 8:34 PM

तामिळनाडू काँग्रेसचे खासदार किर्ती पी.चिंदबरम यांनी तामिळनाडू सरकारला स्वच्छतेवरुन घेरले आहे. किर्ती पी.चिंदबरम यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारला राज्यातील स्वच्छते संदर्भात बीजेपीचे राज्य असलेल्या मध्य प्रदेशातील इंदूर येथील कचरा व्यवस्थापनाकडून धडा घेण्याचा सल्ला दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन इंडिया आघाडीत असल्याने या सल्ल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

काँग्रेस खासदार किर्ती पी. चिदंबरम यांनी सोशल मीडिया हँडल X वर एक पोस्ट टाकली आहे. चेन्नईचे अधिकारी कचरा व्यवस्थापन शिकण्यासाठी मे महिन्यात युरोपला जाणार आहे. चेन्नईच्या अधिकाऱ्यांच्या हा दौरा जागतिक बँकच्या मदतीने होत आहे. क्लीन बार्सिलोना सारख्या शहरांना हे अधिकारी भेट देणार आहेत. कचरा व्यवस्थापन तंत्रांचा अभ्यास करण्यासाठी या शहरांना ते भेट देणार आहेत. तामिळनाडूला स्थानिक डम्पिंग यार्डांना विरोध सुरु झाला आहे. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी हे अधिकारी युरोपला भेट देणार आहेत. त्यामुळे काँग्रेस खासदार किर्ती पी. चिंदबरम यांनी तामिळनाडू सरकारला इंदूरला जाण्याचा सल्ला दिला आहे.

येथे पोस्ट पाहा –

काँग्रेस खासदाराचा इंदूरकडून शिकण्याचा सल्ला

काँग्रेस खासदाराने चेन्नईच्या अधिकाऱ्यांना भाजपाशासित प्रदेश इंदूरकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, चेन्नई महानगर पालिका सांगू शकते का या आधी वेस्ट मॅनेजमेंट तंत्रज्ञान शिकण्यासाठी झालेल्या परदेशी टूर मधून त्यांनी काही शिकून याचा वापर तामिळनाडूत केला आहे का ? त्यांनी तामिळनाडूच्या सद्य परिस्थितीवर टीका करताना सांगितले की बेकार कचरा व्यवस्थापन, रस्त्यावर कुत्रे आणि गायी गुरं बसलेली, तुटलेले फुटपाथ आणि खड्ड असलेले रस्ते ही चेन्नईची ओळख बनली आहे.

इंदूरला जाण्याचा सल्ला

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली इंदूरने लागोपाठ साल २०२५ मध्ये देखील रेकॉर्ड केला आहे. इंदूरला साल २०२५ चा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हटले जात आहे. गेल्या सात वर्षांपासून स्वच्छ शहराचा पुरस्कार इंदूरला मिळत आहे. गृहनिर्माण आणि शहरे मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेसच्या खासदाराने तामिळनाडू सरकारला इंदूरकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.  इंदूर शहर हे मध्य प्रदेशात असून मध्य प्रदेशात गेली अनेक वर्षे भाजपाची कायम सत्ता आहे.

किर्ती पी.चिदंबरम कोण आहेत ?

खासदार कार्ती पी चिदंबरम काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांचे पूत्र आहेत. ते शिवगंगाचे खासदार आहेत. याच मतदार संघातून पी.चिदंबरम सात वेळा खासदार झाले आहे. साल २०१४ मध्ये पी. चिदंबरम लोकसभा निवडणूकीत पडले. त्यानंतर त्यांचा पूत्र किर्ती पी.चिदंबरम यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी २०१९ च्या निवडणूकी याच जागेवरुन विजय मिळविला. त्यानंतर साल २०२४ मध्ये देखील त्यांनी वडीलांच्या मतदार संघातून विजय मिळविला आहे.