'राफेल'वरुन राहुल आक्रमक, लोकसभेत हायव्होल्टेज ड्रामा

नवी दिल्ली : राफेल करारावरुन लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहावयास मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरुन पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांसह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची राफेलसंदर्भातील कथित ऑडिओ टेप प्ले करण्याची परवानगी राहुल गांधी यांनी मागितल्यानंतर लोकसभा सभागृहात हायव्होल्टेज ड्रामा सुरु झाला. मात्र, कुठलीही खातरजमा नसताना अशाप्रकारची ऑडिओ …

'राफेल'वरुन राहुल आक्रमक, लोकसभेत हायव्होल्टेज ड्रामा

नवी दिल्ली : राफेल करारावरुन लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहावयास मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरुन पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांसह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची राफेलसंदर्भातील कथित ऑडिओ टेप प्ले करण्याची परवानगी राहुल गांधी यांनी मागितल्यानंतर लोकसभा सभागृहात हायव्होल्टेज ड्रामा सुरु झाला. मात्र, कुठलीही खातरजमा नसताना अशाप्रकारची ऑडिओ क्लिप लोकसभेत प्ले करु शकत नाही, असे म्हणत लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले. मात्र, तरीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा आक्रमक होत, ऑडिओ क्लिप प्ले करत नसाल, तर ट्रान्सस्क्रिप्ट वाचून दाखवण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यालाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आक्षेप घेतला.

राहुल गांधींचे महत्त्वाचे मुद्दे :

 • भाजपवाल्यांनो, घाबरण्याचं काही कारण नाही, राफेलबाबत जेपीसीचे आदेश द्या, दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा – राहुल गांधी
 • राफेल कराराबात आम्हाला वाटलं होतं, डाळीत काहीतरी काळं आहे, मात्र इथे पूर्ण डाळच काळी आहे, राहुल गांधी लोकसभेत कमालीचे आक्रमक
 • राहुल गांधींनी ऑडिओ टेप प्ले करण्याची परवानगी मागितली, मात्र अरुण जेटलींचा आक्षेप, राहुल गांधींकडून ट्रान्सस्क्रिप्ट वाचून दाखवण्याची तयारी, लोकसभेत हायहोल्टेज ड्रामा – राहुल गांधी
 • मोदींच्या सांगण्यावरुनच अंबनींना कंत्राट, HAL ने युद्ध जिंकलेली विमानं बनवली, तर अंबानी हे हरलेले उद्योगपती – राहुल गांधी
 • HAL कंपनीने युद्ध जिंकणारी विमानं बनवलीत, अनिल अंबानी हे हरलेले उद्योगपती आहेत – राहुल गांधी
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला जाताच विमानांची किमत 526 कोटीवरुन 1600 कोटी झाली – राहुल गांधी
 • मनोहर पर्रिकरांना नव्या कराराची माहिती नव्हती, त्यांना नव्या करारातून का वगळले? – राहुल गांधी
 • राफेलची संख्या 126 वरुन 36 केली, घाईघाईत केवळ 36 विमानांचाच सौदा का केला? – राहुल गांधी
 • राफेलची विमानं तातडीने हवी होती, तर आतापर्यंत आणली का गेली नाहीत? – राहुल गांधी
 • मी मोदींची मुलाखत पाहिली, ती मुलाखत बनावट, राफेलबाबत संपूर्ण देश मोदींना प्रश्न विचारतोय, मात्र उत्तरं मिळत नाहीत – राहुल गांधी
 • राफेल कराराबाबतच्या मुलभूत प्रश्नांचीही उत्तरंही दिली जात नाहीत, देश उत्तराच्या प्रतीक्षेत आहे – राहुल गांधी

पाहा व्हिडीओ :

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे कुणा अज्ञात व्यक्तील उद्देशून सांगत आहेत की, “मुख्यमंत्री पर्रिकारंनी सांगितले की, कुणीच त्यांचं काही बिघडवू शकत नाही. राफेलशी संबंधित फाईल माझ्या बेडरुममध्ये आहेत.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *