AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींचं फक्त काँग्रेस जोडो? जयराम रमेशांची 5 वक्तव्यं विरोधकांची एकजूट उधळून लावणारी..!

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला आहे. जसजसा राहुल यांचा हा प्रवास पुढे सरकत आहे, तसतसे विरोधकांच्या एकजुटीलाही तडे जात आहेत.

राहुल गांधींचं फक्त काँग्रेस जोडो? जयराम रमेशांची 5 वक्तव्यं विरोधकांची एकजूट उधळून लावणारी..!
| Updated on: Sep 16, 2022 | 5:52 PM
Share

नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) काँग्रेसला उभारी देण्यासाठी राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर प्रवासाला सुरुवात केली आहे. काँग्रेसची ही ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) असल्याने विरोधकांच्या एकजुटीला मात्र तडे जात आहेत. या काळात काँग्रेसला कोणीही कमकुवत करण्यासाठी विरोधक एकजूट होऊ शकत नाही, असे म्हणत काँग्रेसने (Congress) टीएमसी, सीपीएम आणि आम आदमी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यामुळे या परिस्थितीत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे रूपांतर आता विरोधी तोडो यात्रेत तर होणार नाही ना असाही सवालही उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत जोडो यात्रा ही विरोधकांच्या एकजुटीची यात्रा नाही, तर भारत जोडो यात्रा म्हणजे काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे काँग्रेस पक्ष मजबूत केल्याशिवाय विरोधकांच्या ऐक्याची कल्पनाही होऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ज्या राजकीय पक्षाला काँग्रेससोबत युती करायची आहे. त्यांनी काँग्रेसकडून सर्व राजकीय घ्यायचे आणि काँग्रेसला काहीही द्यायचे नाही, असा विचार करू नये असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

या राजकीय प्रवासात काँग्रेसला कमकुवत करण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

जयराम रमेश म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या वाढीसाठी ममता बॅनर्जींची टीएमसी कारणीभूत आहे, तर केरळमध्ये सीपीएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सीपीएमकडून टीका केल्यानंतरच जयराम रमेश यांचे हे विधान केले आहे. त्यानंतर डाव्या पक्षानी राहुल गांधी केरळ राज्यात जास्त दिवस घालवत असून त्यांची गरज उत्तर प्रदेशात आहे असं ट्विट त्यांच्याकडून केले गेले आहे.

केरळमध्ये काँग्रेस आणि डावे एकमेकांविरोधात आहेत. तर राहुल गांधी केरळचे खासदार असल्याने आजकाल ते भारत जोडो यात्रेअंतर्गत केरळमध्येच पदयात्रा काढत आहेत.

त्यामुळे सीपीएम पक्ष चिंताग्रस्त आहे. राहुल गांधी यांच्यामुळे मात्र काँग्रेस आणि डावे यांच्यामध्ये आता शाब्दिक चकमक वाढली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या विरोधी पक्षातील नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याच काळात ही भारत जोडो यात्रा निघालेली आहे. आणि देशातील विरोधी पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधात तगडी झुंज देण्यासाठी एकत्र आले आहेत.

सोनिया गांधी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर नितीश कुमार पुन्हा दिल्लीत येणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांनी विरोधी गटातील डझनभर नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

त्यानंतर ते पाटण्याला परतले आहेत. तर त्याच वेळी, ममता बॅनर्जी यांचा अजेंडा स्पष्ट आहे की 2024 मध्ये नितीश कुमार, हेमंत सोरेन आणि अखिलेश यादव यांच्यासारखे पक्ष एकत्र आघाडी तयार करणार आहेत

विरोधकांची मोट बांधल्याशिवाय 2024 च्या निवडणुकीत भाजपला आव्हान देता येणार नाही, हे काँग्रेसला चांगलेच ठाऊक आहे. केवळ काँग्रेसच नाही तर जेडीयूनेही हे संकेत दिले आहेत.

जेडीयूचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी यापूर्वी म्हटले होते की, काँग्रेस आणि डाव्यांशिवाय भाजपविरोधात जोरदार लढा देता येणार नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना मतभेद मिटवून एकत्र यावे लागेल.

भाजप आणि मोदी सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रा’ करत आहेत. त्यामुळे विरोधकांचे एकजुटीचे सगळे डाव धुळीस मिळत आहेत.

काँग्रेसची लढाई भाजपसोबत आहे की विरोधी पक्षांशी, असा सवालही सीपीएमने उपस्थित केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही यात्रा यूपीएचे नसून काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ असल्याचे सांगितले आहे.

भारत जोडो यात्रा ही देशातील जनतेला एकत्र आणण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. या यात्रेतून विरोधी पक्ष एकजूट होण्यास मदत होईलही, पण तो त्याचा मुख्य उद्देश नव्हता हेही स्पष्ट झाले आहे.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.