Cough Syrup: कफ सिरपने नव्हे तर ॲडल्ट डोस… एवढे मृत्यू झाल्यानंतरही मंत्री बरळला

कफ सिरपमुळे देशातील विविध भागात लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात राजस्थानमधील काही मुलांचा समावेश आहे. अशातच आता राजस्थानचे आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांनी कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूंबाबत धक्कादायक विधान केले आहे.

Cough Syrup: कफ सिरपने नव्हे तर ॲडल्ट डोस... एवढे मृत्यू झाल्यानंतरही मंत्री बरळला
Gajendra Singh Khimsar
| Updated on: Oct 08, 2025 | 10:08 PM

कफ सिरपमुळे देशातील विविध भागात लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात राजस्थानमधील काही मुलांचा समावेश आहे. अशातच आता राजस्थानचे आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांनी कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूंबाबत धक्कादायक विधान केले आहे. या मुलांचा मृत्यू ॲडल्ट डोसमुळे म्हणजेच प्रौढांसाठी असलेल्या कफ सिरपच्या डोसमुळे झाल्याचे खिंवसार यानी सांगितले आहे. तसेच आमच्या राज्यात मोठी लोकसंख्या आहे, मात्र फक्त 4 मृत्यूंनंतर यावर नियंत्रण मिळवले गेले आहे ही आमच्या सरकारसाठी चांगली गोष्ट आहे असंही खिंवसार यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणावर पुढे बोलताना खिंवसार म्हणाले की, कंपनीकडून गोळा केलेले नमुने योग्य आहेत सिद्ध झाले आहे मात्र तरीही औषध कंपनीला क्लीन चिट देण्यात आलेली नाही. कोणत्याही कंपनीला त्यांच्या औषधामुळे मृत्यू होऊ नये असे वाटत नाही. या कंपनीची वेगवेगळी 42 औषधे चाचणीत फेल झाली होती. यावर बोलताना खिंवसार यांनी कधी-कधी असं घडतं असतं असतं असं विधान केले आहे.

आतापर्यंत चार बालकांचा मृत्यू

राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे 4 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे मृत्यू सिकरमधील श्रीमाधोपूरमध्ये 1, भरतपूरमध्ये 2 आणि चुरूमध्ये एका बालकाचा मृत्यू झाला आहे. चुरूमधील 6 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर, कुटुंबाने सरकारी रुग्णालयाने दिलेल्या कफ सिरपबद्दल शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आरोग्य विभाग या प्रकरणाची तपासणी करत आहे. तसेच आरोग्य विभागाने या औषधाच्या वितरणावर बंदी घातली आहे.

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे या लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. यात डायथिलीन ग्लायकोल सारख्या विषारी पदार्थाची जास्त मात्रा आढळली आहे. यामुळे किडनी निकामी होते व बालकांचा मृत्यू होतो. आता केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे, तसेच अनेक राज्यांनी या सिरपवर बंदी घातली आहे. या सिरपमध्ये 48.6 % पर्यंत DEG असल्याचे आढळून आले, जे वाहनाच्या ब्रेक फ्लुइडमध्ये वापरले जाते.

औषधाची चव गोड करण्यासाठी याचा वापर होतो, मात्र हे धोकादायक आहे. मध्य प्रदेशात या औषधामुळे बऱ्याच बालकांचा मृत्यू झाला आहे. आता केंद्र सरकारने 6 राज्यांमधील 19 औषधांची चौकशी सुरू केली. तसेच डॉक्टरांनी 5 वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचा सल्ला दिला आहे.