पत्नी सोडून गेली, एअरफोर्सची नोकरी सोडली, साधू बनला; 15 वर्षानंतर एक दिवस अचानक…

काळीज पिळवटून टाकणारी एक अनोखी प्रेम कहाणी समोर आली आहे. तब्बल 15 वर्षापासून दूर राहिल्यानंतर दाम्पत्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या इच्छेखातर दोघांनीही पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्नी सोडून गेली, एअरफोर्सची नोकरी सोडली, साधू बनला; 15 वर्षानंतर एक दिवस अचानक...
CoupleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 1:38 PM

पाटणा : बिहारच्या मोतीहारीमध्ये एका दाम्पत्याची जगावेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. तर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. 15 वर्षापूर्वी नवरा आणि बायकोत वाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. पत्नी बेतिया येथील आईवडिलांच्या घरी आली आणि तिने पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पत्नी कायमची माहेरी निघून गेल्याने तो कोलमडला. त्यामुळे त्याने एअरफोर्सची नोकरी सोडली. साधू बनला. वणवण भटकला अन् पूजा पाठ करू लागला.

दोघा नवरा बायकोंनी कायमस्वरुपी वेगळं राहायचं ठरवलं. पण 15 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम तसूभर कमी झालं नाही. या काळात त्याच्या पत्नीच्या आयुष्यात कोणी आलं नाही अन् साधू बनलेल्या पतीनेही आपल्या आयुष्यात कुणालाही स्थान दिलं नाही. या काळात त्यांचा एक मुलगाही मोठा झाला. तो वारंवार आईला वडिलांबाबत विचारत होता. त्यामुळे पत्नीने नवऱ्याला भेटायचं ठरवलं. दोघेही एकांतात भेटले. एकमेकांबद्दलचे रुसवे फुगवे दूर केले अन् तब्बल15 वर्षानंतर पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

फक्त दोन वर्ष नांदले

ही गोष्ट आहे प्रभाकर कुमासेर पांडेय यांची. प्रभाकर हे गोविंदगज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जितवारपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा विवाह पिपरकोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगरी गावच्या संदीप देवीशी झाला होता. लग्नानंतर दोघेही दोन वर्ष एकत्र नांदले. त्यावेळी प्रभाकर एअरफोर्समध्ये उच्चपदावर कार्यरत होता. मात्र, या दोघांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यातील वाद सुरू झाला. त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

प्रकरण कोर्टात

त्यानंतर दोघांनीही कोर्टात धाव घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले. दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी या दोघांना एकत्र आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण काहीच जमलं नाही. शेवटी पत्नी सोबत राहत नाही म्हणून कोलमडून पडलेल्या प्रभाकर यांनी नोकरीचा राजीनामा दिला. सुखाच्या शोधासाठी तो साधू बनला. साधू बनून गावोगावी भटकला. जंगलात रानावनात राहिला. मिळेल ते खाल्लं. जिथे जागा दिसेल तिथे झोपला. ऊन वारा पाऊस याची काहीच तमा बाळगली नाही. अनेक मंदिरात दिवस दिवस रात्र रात्र बसून ध्यान धारणा केली. पूजा पाठ केला. दाढी वाढली.

मुलामुळे सर्व आई वडील एकत्र

तब्बल 15 वर्ष त्यांची ही वणवण सुरू होती. तिकडे त्यांचा मुलगा मोठा होत होता. मुलाला जसजस कळू लागलं तसतसा तो आईला वडिलांबाबत विचारू लागला. वडिलांना भेटायचा तगादा लावू लागला. त्यामुळे संदीपदेवीचंही काळीज पाघळलं. तिने नवऱ्याची भेट घेतली. सर्व काही विसरून मुलासाठी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याची विनंती केली. प्रभाकरही तयार झाला अन् 15 वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र आले.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.