AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरींचा मोठा विजय, E 20 इंधनाबाबत पोस्ट कराल तर…कोर्टाने ती परवानगी दिली!

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता ई-20 इंधनाविरोधात सोशल मीडियावर आंदोलन उभे केले जात आहे. एकीकडे हे आंदोलन फोफावत असताना दुसरीकडे केंद्रीय रस्ते व विकासमंत्री नितीन गडकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नितीन गडकरींचा मोठा विजय, E 20 इंधनाबाबत पोस्ट कराल तर...कोर्टाने ती परवानगी दिली!
NITIN GADKARIImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 3:48 PM
Share

 E20 Fule Protest : सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची एकच चर्चा आहे. या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता सोशल मीडियावर नवी चळवळ उभी राहिली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाईन चळवळीलाही तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ई२० इंधनाविरोधात पुकारण्यात आलेल्या या व्हर्च्यूअल आंदोलनात अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. ‘E20 जनता पार्टी‘ नावाच्या सोशल मीडिया खात्याला लाखो लोकांनी फॉलो केले आहे. ई२० इंधनामुळे गाड्यांचे इंजिन खराब होते, असा दावा केला जातोय. हा दावा केला जात असतानाच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या बाजूने न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता सोशल मीडियावर E20 इंधनावर सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?

न्यायालयाच्या निर्णयामुळे नितीन गडकरी यांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. ई२० इंधनासंदर्भात नितीन गडकरींविरोधात अनेक आक्षेपार्ह पोस्ट पडत आहेत. या पोस्टमुळे नितीन गडकरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने आता ई२० इंधनावरून नितीन गडकरी यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस धाडण्यास परवानगी दिली आहे. या आदेशानुसार मेटा, गूगल, डीपफेक एआय कंटेंट पसरवणाऱ्याविरोधात कारवाई होणार आहे. म्हणूनच आता ई२० इंधनाविरोधात सोशल मीडियावर मत व्यक्त करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

नितीन गडकरी यांच्यावर होत आहे टीका

गेल्या अनेक दिवासांपासूनम ई२० पेट्रोलमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली जात आहे. लोकांच्या इच्छेविरुद्ध ई२० इंधनाचा वापर करण्यास सक्ती केली जात आहे. या इंधनामुळे वाहनांच्या इंजिनीवर तसेच मायलेजवर परिणाम होतोय, असे म्हटले जात आहे. याच कारणामुळे नितीन गडकरी यांच्यावर टीका केली जातेय. सोशल मीडियावर त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जातेय. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात नितीन गडकरी यांच्याविरोधातही बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे गडकरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?