अहमदाबाद विमान अपघाताबद्दल धक्कादायक खुलासा, पायलटची चूक? कोर्टाने थेट…

Ahmedabad plane crash accident : 12 जून 2025 रोजी एअर इंडियाचे विमान लंडनला निघाले. मात्र, टेकऑफच्या काही सेकंदात या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमान अपघातात तब्बल 270 लोकांचा जागीच जीव गेला. आता कोर्टाने यावर मोठे भाष्य केले आहे.

अहमदाबाद विमान अपघाताबद्दल धक्कादायक खुलासा, पायलटची चूक? कोर्टाने थेट...
ahmedabad plane crash
| Updated on: Sep 22, 2025 | 1:38 PM

गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून 12 जून 2025 रोजी एअर इंडियाचे विमान लंडनला निघाले. मात्र, टेकऑफच्या काही सेकंदात या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमान अपघातात तब्बल 270 लोकांचा जागीच जीव गेला. विमानातील फक्त आणि फक्त एकच प्रवासी वाचला. या अपघातानंतर देशभरात भीतीचे वातावरण बघायला मिळाले. अख्ख्ये एक कुटुंब देखील या अपघातात गेले. या अपघातानंतर काही गंभीर आरोप करण्यात आली. मात्र, अजूनही अपघाताचे खरे कारण काय ते पुढे येऊ शकले नाही. नुकताच कोर्टाने मोठा संताप व्यक्त करत थेट नोटीसच पाठवली आहे. अहमदाबाद विमान अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेत विमान अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला थेट नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाने एएआयबीच्या प्राथमिक तपासाला थेट बेजबाबदार म्हटले आहे. त्यांनी अहवालात थेट विमान अपघाताचे काही स्पष्ट कारण दिले नसून पायलटची चूक असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, स्पष्ट कोणतेही कारण त्यांनी त्या अहवालात दिले नाहीये. यामुळे कोर्टाने बेजबाबदार म्हटले.

लाईव्ह लॉ नुसार, सेफ्टी मॅटर्स फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा त्यांनी केला. याचिकेत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एएआयबीने त्यांच्या अहवालात एक संशय व्यक्त करत म्हटले आहे की, इंधनाच्या कमीमुळे विमान अपघात झाला असावा.

वकील प्रशांत भूषण यांच्या म्हणण्यानुसार, एअर इंडियाचे विमान, बोईंग ड्रीमलायनर 171 अनुभवी वैमानिक होते. आता या अपघाताला 100 दिवस झाली असूनही आतापर्यंत फक्त आणि फक्त प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालातही विमान अपघाताचे कारण स्पष्टपणे सांगितलेले नाही. बोईंग विमानाचा अपघात इतका जास्त भयंकर होता की, या अपघाताचे काही धक्कादायक व्हिडीओही पुढे आली आहेत.