AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात ज्यामुळे झाला ते थ्रस्ट म्हणजे काय? थ्रस्टची भूमिका किती महत्त्वाची?

12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतरच कोसळले. थ्रस्ट फेल्युअरमुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पायलटने एटीसीला आपत्कालीन संदेश पाठवला होता, परंतु विमानाला वर उचलण्याची शक्तीच नव्हती. या दुर्घटनेत 275 जणांचा मृत्यू झाला. थ्रस्ट अपयशाचे विविध कारणे, जसे की इंजिन बिघाड, इंधनातील समस्या आणि नियंत्रण प्रणालीचे अपयश, यांचा विचार केला जात आहे.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात ज्यामुळे झाला ते थ्रस्ट म्हणजे काय? थ्रस्टची भूमिका किती महत्त्वाची?
अहमदाबाद विमान दुर्घटनाImage Credit source: social media
| Updated on: Jun 16, 2025 | 2:39 PM
Share

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताचं कारण समोर आलं आहे. थ्रस्टमुळे हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. विमानात हवेत उडण्याची शक्तीच उरली नाही. त्यामुळे विमान थेट खाली कोसळलं आणि मोठी दुर्घटना घडली. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतलं आणि काही सेंकदात पायलट सुमित सभरवाल यांनी एटीला मेडेचा एमर्जन्सी मेसेज पाठवला होता. सभरवाल यांनी नियमानुसार 650 फूट उंचावरून मेडे मेडे मेडे असं तिनदा म्हटलं होतं. थ्रस्ट नसल्यामुळे विमान वर जाऊ शकत नसल्याचं त्यांना जाणवलं होतं. अहमदाबाद एटीसने परत सभरवाल यांना संपर्क केला होता. पण तेवढ्यात सर्व संपलं होतं. सभरवाल यांचा नंतर संपर्क झालाच नाही.

अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने विमानाने टेक ऑफ केलं आणि अवघ्या 40 सेकंदात विमान कोसळलं. विमान कोसळण्याच्या आधी पायलट सभरवाल यांनी ट्रॅफिक कंट्रोलला फोन केला होता आणि एअर ट्रॅफिक सोबत त्यांचा संपर्क झाला होता. हे सर्व फक्त 15 सेकंदात झालं. त्यानंतर सभरवाल यांच्याकडे परत उत्तर मिळवण्यासाठी वेळच नव्हती. त्यामुळेही विमान कोसळल्याचं सांगितलं जातं.

थ्रस्ट म्हणजे काय?

आता पायलट सभरवालच्या आपत्कालीन कॉलवरून असे दिसून येते की, विमानात थ्रस्ट नसल्यामुळे हा अपघात झाला. थ्रस्ट म्हणजे विमानाच्या इंजिनद्वारे निर्माण होणारी शक्ती. थ्रस्टमुळे विमानाला हवेत उडण्याची शक्ती मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर, गाडीमध्ये एक्सिलरेटर असतं त्याप्रमाणेच विमानात थ्रस्टचं काम असतं. म्हणजेच, थ्रस्ट (जोर) दिल्याशिवाय विमान उडू शकत नाही.

थ्रस्टमधील समस्येचं कारण काय ?

आता, थ्रस्टमधील समस्येचे कारण काय आहे ? हे समजून घेऊ. पहिले कारण इंजिनमधील बिघाड असू शकतो. जर टर्बाइन ब्लेड तुटले किंवा इंधन पुरवठ्यात व्यत्यय आला तर थ्रस्ट कमी होऊ शकतो. निकृष्ट दर्जाचे इंधन किंवा इंधन पुरवठ्याच्या पाईपमधील बिघाडामुळे अथवा इंधनाच्या समस्येमुळे थ्रस्ट प्रभावित होतो.

नियंत्रण प्रणालीचे अपयश हे आधुनिक विमानांच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालींवर अवलंबून असते. थ्रस्ट नियंत्रण प्रणाली किंवा सेन्सर फेल झाल्यास, इंजिन थ्रस्ट देऊ शकत नाही. खराब हवामान, जसे की उच्च उंचीवरील कमी हवेचा दाब किंवा अत्यंत तापमान, देखील थ्रस्टवर परिणाम करू शकते.

लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.