Omicron : जगाचा ताप वाढला! ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा पहिला मृत्यू; जॉन्सन म्हणाले…

| Updated on: Dec 13, 2021 | 6:48 PM

जगाचा ताप वाढवणारी बातमी आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हायरंटचा पहिला मृत्यू झाला आहे. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे.

Omicron : जगाचा ताप वाढला! ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा पहिला मृत्यू; जॉन्सन म्हणाले...
OMICRON
Follow us on

लंडन: जगाचा ताप वाढवणारी बातमी आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हायरंटचा पहिला मृत्यू झाला आहे. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे. या स्ट्रेनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. 30 पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन करतानाच ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.

वेस्ट लंडनच्या पॅडिंगटनमध्ये लसीकरणाच्या वेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी ही माहिती दिली. ओमिक्रॉनचा संसर्ग होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे, असं जॉन्सन यांनी सांगितलं.

35 लाख लोकांना बुस्टर डोस देणार

ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने ब्रिटनमध्येन नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. 30 वर्षावरी व्यक्तींना हे बुस्टर डोस दिले जात आहेत. देशात ओमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे, अशी माहिती ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं. इंग्लंडच्या राष्ट्री आरोग्य सेवा विभागाच्या मते, देशात 30 ते 39 वयोगटातील 75 लाख लोक आहेत. त्यामध्ये 35 लाख लोकांना आजपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

2.2 कोटी नागरिकांना बुस्टर डोस दिला

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा पहिलाच बळी गेला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरिएंटला मागे टाकेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोविड 19 बुस्टर डोसचा कार्यक्रम वेगाने राबवला जात आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 2.2 कोटी लोकांना बुस्टर डोस देण्यात आला आहे, असं ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी परी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे 4 तर मुंबईत 3 रुग्ण सापडले होते. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 17 वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेले चारही रुग्ण नायजेरियावरून आलेल्या ओमिक्रॉन बाधित महिलेचे नातेवाईक आहे. या सात पैकी चार रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला होता. तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. लसीकरण न झालेला बालक साडेतीन वर्षाचा आहे. विशेष म्हणजे यातील चारही रुग्णांना कोणतेही लक्षण आढळून आले नाहीत. तर तीन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळले आहेत.

 

संबंधित बातम्या:

Omicron : बाप रे! राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण सापडले, मुंबईत 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 रुग्ण सापडल्याने टेन्शन वाढलं

Omicron ची धास्ती! औरंगाबादेत दक्षिण अफ्रिकेसह विदेशातून 46 जण आले, 21 जण निगेटिव्ह

Health Tips : तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!