AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : तेलाच्या किमती धाड.. धाड कोसळल्या, अखेर गुड न्यूज आलीच, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत..

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात हे दर वाढताना दिसले. भारतात देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे सांगितले जातंय. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच आज मोठी घसरण नोंदवण्यात आली.

Petrol Diesel Price : तेलाच्या किमती धाड.. धाड कोसळल्या, अखेर गुड न्यूज आलीच, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत..
Petrol Diesel Price
| Updated on: Jul 06, 2026 | 9:52 AM
Share

Petrol Diesel Price Today  : इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढताना दिसल्या. या युद्धात इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आला. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठा हाहाकार उडाला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या. त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होताना दिसला. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चार वेळा केंद्र सरकारने वाढवल्या. सतत महागाई वाढताना दिसली. खाद्य तेलाचेही भाव वाढली. आता इराण आणि अमेरिका युद्ध थांबले आहे. पुरवठा साखळी पुन्हा व्यवस्थित झाली. जागतिक बाजारात यादरम्यानच कच्च्या तेलाचे भाव आता कमी होताना दिसत आहेत. दररोज कच्च्या तेलाचे भाव कमी होत असताना भारताच्या शेजारील देशांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतात अजून किमती काही कमी झाल्या नाहीत.

ज्यावेळी जागतिक बाजाराज कच्च्या तेलाचे भाव वाढत होते, त्यावेळी केंद्र सरकारने देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका असल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर ठेवले. आता एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही गाडीत पेट्रोलची टाकी फुल करत असाल तर लगेचच थांबा. कारण देशात आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात.

6 जुलै 2026 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल केला नाही. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती धाड धाड कमी नक्की होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत. ओपेक प्लसने ऑगस्टपासून तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे पुरवठा वाढण्याची अपेक्षा आहे.

परिणामी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 71.88डॉलर्स, तर डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 68.58 डॉलर्स इतकी स्थिरावली आहे. सतत कच्च्या तेलाच्या किमती घसरत असल्याने भारतात देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरू शकतात. याबाबत केंद्र सरकारकडून लवकरच मोठा निर्णय हा जाहीर केला जाऊ शकतो. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये दर कमी झाली आहेत.

Follow Us
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा