
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. होर्मूज स्ट्रेट बंद झाल्यामुळे सध्या जागातील अनेक देशांमध्ये भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज असते, त्यातील सुमारे 25 टक्के वाहतूक या मार्गेने होते. तर भारताला जेवढ्या कच्च्या तेलाची आणि इंधनाची गरज आहे, त्यातील सुमारे 40 टक्के वाहतूक या मार्गाने होते. दरम्यान मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे आखाती देशातील होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. याचा फटका हा इतर देशांप्रमाणेच भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे.
गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यानं अनेक हॉटेल चालकांवर सध्या हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तसेच घरगुती वापराच्या गॅससाठी देखील नागरिकांवर आता लाईन लावण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. दरम्यान या सर्व परिस्थितीवर केंद्र सरकारकडून लक्ष ठेवलं जात असून, नागरिकांना सुरळीत गॅस सिलिंडरचा पुरवठा कसा होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर आात केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे.
ज्यांच्या घरात पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) चा पुरवठा होतो, अशा नागरिकांना आता घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन ठेवता येणार नाहीये. ‘ज्यांच्याकडे PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांनी LPG कनेक्शन तात्काळ परत करावे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. तसेच ‘PNG कनेक्शन असलेल्या व्यक्तींना LPG सिलिंडर रिफिल देखील आता मिळणार नाहीये. हा आदेश आजपासून लगेच लागू करण्यात आला आहे.
टेन्शन वाढलं
दरम्यान जिथे अद्याप पीएनजी गॅस पोहोचलेला नाही, अशा लोकांना एलपीजी गॅसचा नियमित आणि सुरळीत पुरवठा व्हावा, हा या निर्णयामागे सरकारचा हेतू आहे. मात्र अनेक ग्राहक असे आहेत की, त्यांच्या नावे पीएनजी आणि एलपीजी असे दोन्ही कनेक्श आहेत. जर पीएनजी गॅस पुरवठ्यामध्ये काही समस्या निर्माण झाली तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या घरात एलपीजीचं सिलिंडर देखील आणून ठेवलं आहे. मात्र आता सरकारच्या नव्य आदेशामुळे यातील कोणतंही एकच कनेक्शन वापरता येणार असल्यानं अनेकांचं टेन्शन वाढलं आहे.