AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या आणखी एका मोठ्या शत्रूची हत्या, धाड,धाड गोळ्या घातल्या

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एक शत्रूची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. आधी चाकूने हल्ला करण्यात आला, त्यानंतर गोळ्या झाडण्यात आल्या.

मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या आणखी एका मोठ्या शत्रूची हत्या, धाड,धाड गोळ्या घातल्या
terroristImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 4:06 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार बिलाल आरिफ सलाफी असं या दहशतवाद्याचं नावं आहे. शनिवारी इदच्या नमाजवरून परतत असताना बिलाल आरिफ सलाफी याच्यावर आधी चाकून हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याच्यावर गोळा झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. बिलाल याची मुरीदकेच्या उद्ध्वस्त झालेल्या लष्कर एक तैयबाच्या मुख्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं मुरीदकेच्या या मुख्यालयावर एअर स्ट्राईक केला होता, या एअर स्ट्राईकमध्ये हे मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे.

दरम्यान त्याची हत्या का करण्यात आली? याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबीक वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांना अटक करण्यात आलं आहे. बिलाल याच्यावर लष्कर एक तैयबा संघटनेमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मुरीदकेच्या शाखेत दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. तरुण, तरुणींना दहशतवादी संघटनेत भरती करून त्यांचं ब्रेनवॉश करण्याचं कामं बिलाल आरिफ सलाफी करत होता.

ग्लोबल टेरर इंडेक्समध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर

दरम्यान वर्षानुवर्ष दहशतवादाला पोसण्याचं काम पाकिस्तानकडून सुरू आहे. मात्र आता त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागत आहे. ग्लोबल टेरर इंडेक्स 2026 रिपोर्ट समोर आला आहे. या ग्लोबल टेरर इंडेक्समध्ये पाकिस्तान पहिल्यांदाच पहिल्या स्थानावर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा जगभरात पाकिस्तानची मान खाली गेली आहे. जगाला सत्य कळालं आहे. तर 2025 मध्ये सर्वात जास्त दहशतवादी प्रभावीत देश म्हणून पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर होता.  भारतातही वारंवार दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न पाकिस्तानमधील या दहशतवादी संघटनांकडून सुरू असतो. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?