चीनचं भारताच्या 43 हजार चौरस किमीपेक्षा अधिक भागावर अतिक्रमण : राजनाथ सिंह

| Updated on: Feb 11, 2021 | 6:18 PM

नेक महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (11 फेब्रुवारी) अखेर तोडगा निघाला आहे.

चीनचं भारताच्या 43 हजार चौरस किमीपेक्षा अधिक भागावर अतिक्रमण : राजनाथ सिंह
Follow us on

नवी दिल्ली : अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (11 फेब्रुवारी) अखेर तोडगा निघाला आहे. मागील अनेक दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरु होती. मात्र, दोन्ही देश आपल्या भूमिकांवर ठाम होते. त्यामुळे सीमेवरील तणावावर मार्ग निघत नव्हता. अखेर दोन्ही देशांनी सीमेवर ‘जैसे थी’ स्थिती ठेवत आपआपलं सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत दोन्ही सैन्यात करारही झाला. याचा व्हिडीओ देखील प्रकाशित करण्यात आलाय (Defence Minister Rajnath Singh inform that China occupy 43 thousand Square Kilometer land of India).

सैन्याकडून प्रकाशित करण्यात आलेल्या व्हिडीओत दोन्ही बाजूचे सैन्य आपले रणगाडे मागे घेताना दिसत आहेत. तसेच भारत आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करत करारावर स्वाक्षरी केल्या. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सीमेवरील या घडामोडींची माहिती संसदेत दिली.

सप्टेंबर 2020 पासून दोन्ही देशांचं सैन्य आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरु

राजनाथ सिंह म्हणाले, “चीनकडून मागील वर्षी एप्रिल, मे 2020 दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि सैन्य गोळा करण्यात आलं होतं. या भागात चीनने आपलं सैन्य तैनात केलं. त्याला भारताने देखील उत्तर दिलं होतं. चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना संसदेने देखील अभिवादन केलं होतं. मी आज संसदेला त्याबाबत झालेल्या घडामोडींची माहिती देऊ इच्छितो. मागील वर्षी सप्टेंबरपासून दोन्ही देशांनी सैन्य आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. सध्या दोन्ही देश शांततापूर्ण पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.”

चीनने 43 हजार चौरस किमीपेक्षा अधिक भाग बळकावला

“सीमेवर दोन्ही देशाच्या सैन्यांने माघार घ्यावी आणि जी स्थिती आहे ती तशीच ठेवावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यामुळे शांतता प्रस्थापित होईल. चीनने 1962 पासून लडाखमधील 38 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र अनधिकृतपणे बळकावलं आहे. याशिवाय पाकिस्तानने भारताची 5180 हजार चौरस किमी जमीन अनधिकृतपणे बळकावत चीनला दिलीय. अशाप्रकारे चीनने 43 हजार चौरस किमीपेक्षा अधिक भागावर अनधिकृतपणे अतिक्रमण केलंय,” असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर देखील अनेक चौरस किमी भागाला आपलं असल्याचा दावा करतो. भारताने चीनच्या या अनधिकृत दाव्यांना कधीही मान्य केलेलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

‘चीनच्या कृतीमुळे सीमेवरील शांतता भंग’

राजनाथ सिंह म्हणाले, “मागीलवर्षी चीनने केलेल्या कृतीमुळे सीमेवरील शांतता भंग झाली होती. त्यामुळे चीन आणि भारताच्या संबंधांवरही परिणाम झाला. मी स्वतः सप्टेंबर 2020 मध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांनी देखील आपल्या समकक्षांसोबत बैठका केल्यात.”

हेही वाचा :

Video: …आणि चीनची सेना LAC वरुन माघारी फिरली ! हा घ्या पुरावा !

चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये अख्खं गाव वसवलं, पण मोदींकडे हे चीननं केल्याचं सांगायला धाडस नाही : असदुद्दीन ओवैसी

जमिनीनंतर चीनचा आता भारताच्या पाण्यावर डोळा, पवित्र ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरणं बांधण्याची तयारी

व्हिडीओ पाहा :

Defence Minister Rajnath Singh inform that China occupy 43 thousand Square Kilometer land of India