जमिनीनंतर चीनचा आता भारताच्या पाण्यावर डोळा, पवित्र ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरणं बांधण्याची तयारी

बीजिंग : साम्राज्यवादी चीनने भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर आता पाण्यावरही अतिक्रमण करण्यास सुरुवात केलीय. चीन सध्या ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरणं बांधण्याची तयारी करत आहे. या धरणावर अंदाजे 60 गिगावॅट वीज निर्मितीचाही उद्देश असल्याचं कळतंय. हे धरण तिबेट या स्वतंत्र प्रदेशता बनवलं जाणार आहे. त्यामुळे तिबेटमधील नागरिक आणि पर्यावरणवाद्यांकडून या महाकाय धरणाला विरोध होतोय. […]

जमिनीनंतर चीनचा आता भारताच्या पाण्यावर डोळा, पवित्र ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरणं बांधण्याची तयारी
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 5:04 PM

बीजिंग : साम्राज्यवादी चीनने भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर आता पाण्यावरही अतिक्रमण करण्यास सुरुवात केलीय. चीन सध्या ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरणं बांधण्याची तयारी करत आहे. या धरणावर अंदाजे 60 गिगावॅट वीज निर्मितीचाही उद्देश असल्याचं कळतंय. हे धरण तिबेट या स्वतंत्र प्रदेशता बनवलं जाणार आहे. त्यामुळे तिबेटमधील नागरिक आणि पर्यावरणवाद्यांकडून या महाकाय धरणाला विरोध होतोय. मात्र, 2060 पर्यंत कार्बन उत्सर्जनमुक्त होण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी चीन हा प्रकल्प मोठ्या ताकदीने रेटत आहे (China is planning to build worlds largest dam on Brahmaputra river in Tibet).

विशेष म्हणजे चीन ज्या तिबेटमध्ये हे धरणं बनवण्याचा घाट करत आहे त्या तिबेटमध्ये नद्यांची देवीप्रमाणे पुजा केली जाते. नद्यांना जपणं आणि त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप न करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच चीनने तिबेटवर नियंत्रण प्रस्थापित करण्याआधी तिबेटमधील नद्यांवर एकही धरण बांधलेलं नव्हतं. मात्र, चीनच्या साम्राज्यवादाने तिबेटच्या परंपरा मोडीत काढत धरणं बांधण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे स्थानिकांमध्ये याविरोधात मोठा असंतोष आहे.

भारत,बांग्लादेशची चिंता वाढणार

ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून वाहत येऊन भारत आणि बांग्लादेशातून वाहते. त्यामुळे दोन्ही देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, चीननं भारत आणि बांग्लादेशवर याचा काही परिणाम होणार नाही, दोन्ही देशांच्या हिताचा विचार केला जाणार असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान,भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जून महिन्यात लडाख जवळील गलवान खोऱ्यात तणाव झटापट झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता.

गेल्या सहा महिन्यांपासून पँगाँग सरोवरच्या पश्चिम भागात घुसखोरी करून ठिय्या मांडून बसलेल्या चीनने अखेर या परिसरातून आपले सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शविली होती. पँगाँग सरोवराच्या फिंगर 8 पर्यंत सैन्य मागे घेऊन जाण्यास चीनने तयार असल्याचे स्पष्ट केले होते.

चीनमधील ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना 2021 ते 2025 या 14 व्या पंचवार्षिक योजनेत यारलुंग जंगबो नदीवर धरण बांधण्याचा विचार करत आहे. तिबेटमध्ये या धरणाची निर्मिती करण्याचा चीनचा मानस आहे. ग्लोबल टाईम्सनं पॉवर कंस्ट्रक्शन ऑफ चायनाच्या सूत्रांच्या माहितीनुसार चीन ब्रह्मपुत्रा नदीवर मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार असल्याची माहिती दिली आहे.

ब्रह्मपुत्रा नदी आशियातील सर्वात मोठी नदी

ब्रह्मपुत्रा नदी आशियातील सर्वात महत्वाची नदी आहे, ही नदी चीन भारत आणि बांग्लादेशमधून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. पॉवर कन्सट्रक्शन कॉर्प ऑफ चायनाच्या चेअरमनने मागील आठवड्यात एका परिषदेत चीनच्या इतिहासातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार असल्याचे स्पष्ट केले. (China going to build a major dam on Brahmaputra river reported by sources)

चीननं तिबेटवर स्वामित्व दावा केला आहे. या भागात दक्षिण आशियातील प्रमुख सात नद्यांची उगमस्थान आहेत. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, इरावदी,सल्वेन यांग्त्जी आणि मँकाँग या नद्यांच्या उगमस्थानवर चीनचं नियंत्रण प्रस्थापित होणार आहे.

संबंधित बातम्या: 

मोठी बातमी: पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागे घेण्याची चीनची तयारी, भारताला दिला ‘हा’ प्रस्ताव

भारत-चीन तणाव कायम, वाद निवळण्यासाठी 6 नोव्हेंबरला आठवी बैठक

व्हिडीओ पाहा :

China is planning to build worlds largest dam on Brahmaputra river in Tibet

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.