
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे (Delhi Blast) संपूर्ण देश हादरला असून त्यासंदर्भात आत नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. दरम्यान दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलशी जोडलेले असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणा ते लखनऊ येथे केलेल्या ऑपरेशनमध्ये त्याचा पर्दाफाश केला होता. या कारवाईमध्ये फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीना शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर शाहीना शाहिद ही काही साधीसुधी डॉक्टर नव्हे तर ती जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेच्या जमात उल मोमिनतची कमांडर होती. सूत्रांच्या सांगण्यानुसार, या संघटनेची पाकिस्तानमधील प्रमुख म्हणजे सादिया अजहर आहे, जी दशहतवादी मसूद अझहरची बहीण आणइ कंधार हायजॅक केसचा मास्टरमाईंड यूसूफ अजहरची पत्नी आहे. म्हणजेच फरीदाबादमधून अटक करण्यात आलेली डॉक्टर थेट जैश-ए-मोहम्मदच्या दहशतावाद्यांशी कनेक्टेड होती. दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट हा या नेटवर्कचा पुढचा दुवा होता का हे आता एजन्सी हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
दिल्ली ब्लास्टचं फरीदाबाद कनेक्शन
काल म्हणजेच 10 नोव्हेंबर, सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी वाजता दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका चालत्या कारमध्ये स्फोट झाला. यात नऊ जणांचा मृत्यू झाला. मात्र या स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची आय-20 कार पार्किंगमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यानंतर अवघ्या 4 मिनिटांत हा स्फोट झाला. या कारमध्येच दहशतवादी डॉ. मोहम्मद उमर होता अशी शंका व्यक्त केली जात आहे. उमर हा फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असू शकतो असे पोलिसांचे म्हणणे आहे. अलिकडेच, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद ते लखनऊ मोठी कारवाई करत 2900 किलो स्फोटके (संशयित अमोनियम नायट्रेट) जप्त केली. या कारवाईअंतर्गत, फरीदाबाद येथील डॉ. मुझम्मिल शकील आणि लखनऊ येथील महिला डॉक्टर शाहीन शाहिद यांना अटक करण्यात आली.
Delhi Blast : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, याआधी अनेक स्फोट, कधी हादरली दिल्ली ?
लखनऊ कनेक्शनने वाढवली चिंता
तपासात असेही आढळून आले की अटक करण्यात आलेल्या शाहीनाचे लखनौशी जुने कौटुंबिक संबंध होते. तिचे आजी-आजोबा लालबाग परिसरात राहत होते आणि ती लहानपणी अनेक वेळा लखनौला आली होती. जरी या लिंकची अधिकृतपणे पुष्टी झालेली नसली तरी, उत्तर प्रदेश पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
एमबीबीएस स्टुडंटने केली पोलखोल
स्पेशल टास्क फोर्सने (STF) 30 ऑक्टोबर रोजी फरिदाबादच्या धौज परिसरातून अल-फलाह विद्यापीठातील एमबीबीएसचा विद्यार्थी डॉ. मुझमिल अहमद याला अटक केली, तेव्हा संपूर्ण कट उघडकीस आला. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान मुझमिलने शाहिना शाहिदचे नाव घेतले. जेव्हा तिच्या आलिशान कारमध्ये AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन सापडल्या तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. कारण कारची नंबर प्लेट डॉ. शाहिना यांच्या नावावर होती. शाहिना एका प्रतिष्ठित रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती, ज्यामुळे तिच्यावर कोणालाही संशय आला नाही. आता एजन्सीकडून तिचे कॉल डिटेल्स, बँक ट्रान्झॅक्शन आणि सोशळल मीडिया चॅट्स चपासली जात आहेत.