अभिजीत दिपकेंपासून आजीच्या निधनाची बातमी लपवली? दिल्ली पोलिसांनी थेट पुरावाच दाखवला; व्हिडीओ दाखवत सांगितलं…
Delhi Police On Abhijeet Dipke Detention: दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंपासून त्यांच्या आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी सांगितली की लपवली? पोलिसांनी दाखवलेल्या व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

जंतर मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या संदर्भात मुख्य न्यायमूर्तींचे अभिजित दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्या आजीच्या निधनाची बातमी समोर आली. सीजेपीने दिल्ली पोलिसांवर अभिजीत दीपके यांना त्यांच्या आजीच्या निधनाची माहिती न दिल्याचा आणि त्यांना ताब्यात घेतल्याचाही आरोप केला होता. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली.
डीसीपी जनसंपर्क अधिकारी नेहा यादव यांनी अटकेचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, अभिजीत, सौरभ आणि आशुतोष यांना आंदोलन करण्याची परवानगी न दिल्यामुळे ताब्यात घेण्यात आले होते. पूर्वी दिलेल्या हमीचे पालन केले गेले नाही. मागच्या वेळी हिंसाचार, जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. परवानगी देऊनही हे सर्व घडले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेमुळे यावेळी परवानगी देण्यात आली नाही. नवी दिल्लीतील आंदोलनामुळे कलम १६३ बीएनएस लावण्यात आले.
Police releases Video of them informing Abhijeet Dipke about his grandmother, asked him to speak to the family – he refused
This is what Leftist-Izlamists culture is – Pls don’t let ur son and daughter anywhere near these thugs https://t.co/TLYt4vgBh9
— Mihir Jha (@MihirkJha) October 11, 2026
यानंतर दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपकेंच्या आजीच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण दिले आहे. डीसीपी, जनसंपर्क अधिकारी नेहा यादव यांनी सांगितले की, अभिजीत दिपकेंना त्यांच्या आजीच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. अभिजीत दिपकेंच्या आजीच्या मृत्यूची बातमी मिळताच दिल्ली पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विमानाची सोय, फोन कॉल्स आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.
Why did you delete the part where I was asking for my phone so I could retrieve my cousin’s number? And where I was asking to let me speak to my lawyers?
The same Delhi Police which is now taking the moral high ground for informing me about my grandmother’s demise and offering me a ride home came to me at 3:30 in the morning with arrest papers, demanding that I sign them.
Where did all that humanity go at 3:30 AM? Despite knowing that I had just lost my grandmother, they still insisted that I sign the arrest papers. I refused until I was allowed to speak to my lawyers.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 11, 2026
नेहा यादव यांनी पुढे सांगितले की, त्यांच्याकडे पुन्हा मदत मागण्यात आली. पण पोलीस चौकशीत ही वस्तुस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली. पोलीस पत्रकार परिषदेदरम्यान एक व्हिडिओ दाखवण्यात आला. ज्यामध्ये पोलीस अधिकारी दीपकेंना त्यांच्या आजीच्या मृत्यूविषयी सांगत आहेत. त्यात अभिजीत दीपके “मला अटक करा” असे म्हणताना ऐकू येतो. अभिजीत दीपकेंनी त्ंयाच्या वडिलांशी बोलण्यासही नकार दिला. त्यांनी पोलिसांना त्याच्या वडिलांचा फोन नंबर देण्यासही नकार दिला, असं सांगण्यात आले आहे.
यावर अभिजीत दिपके म्हणाले की, साडेतीन वाजता माझ्या आई-वडिलांना फोन लावून दिला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तुमच्या आई-वडिलांना सांगा की तुम्हाला अटक झालेली आहे. माझी आजी वारली, तरी मला घरच्यांशी बोलू दिलं नाही.. हा काय प्रकार आहे? भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होता. दुपारी मी दिल्ली पोलिसांना सांगितले की, मला फोन लावू द्या आणि माझ्या भावाशी बोलू द्या. माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि मला नंबर पाठ नव्हता. मोबाईल वरती नंबर पाहून मी तुम्हाला नंबर देतो आणि मला बोलू द्या, असे मी दिल्ली पोलिसांना सांगितले. मात्र दिल्ली पोलिसांनी मला दोन मिनिटांसाठीही फोन दिला नाही. कायद्यानुसार, जेव्हा तुम्ही अटक करता, त्यावेळेस वकिलांनाही हजर करावे लागते.
