राहुल गांधी यांचं ‘ते’ ट्विट ट्विटरने हटवले; वकिलाच्या तक्रारीनंतर कारवाई

अखेर ट्विटरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ते ट्विट हटवलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी या पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता.

राहुल गांधी यांचं 'ते' ट्विट ट्विटरने हटवले; वकिलाच्या तक्रारीनंतर कारवाई
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 10:21 AM

नवी दिल्ली: अखेर ट्विटरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ते ट्विट हटवलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी या पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्याला भाजपनेही आक्षेप घेतला होता. तर एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्याने या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे ट्विट हटवण्यात आलं आहे. (Delhi Rape Case Twitter removed Rahul Gandhi tweet shared the photo of Delhi rape victim parents)

नांगल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता. या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता. विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असं जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

कठोर कारवाई करा

राहुल यांनी केलेलं कृत्य हे पोक्सो कायद्यांतर्गत येतं. तसेच भादंविच्या कलम 228अच्या कलम 23 अंतर्गत हा गुन्हा आहे, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरमी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस देऊन हे ट्विट हटवण्यास सांगितलं होतं. तसेच या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यासही सांगितलं होतं.

पुजाऱ्यासह चौघांना अटक

राहुल यांनी बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं होतं. देशाच्या या मुलीला न्याय हवा आहे, असंच या मुलीच्या आई-वडिलांचे अश्रू सांगत आहेत. न्यायाच्या मार्गावर आपण या मुलीच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. दरम्यान, दिल्ली कँट परिसरातील ओल्ड नांगल स्मशानभूमीत या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. जुन्या नांगल गावच्या पुजाऱ्याने सहमतीशिवायच या मुलीवर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप या मुलीच्या कुटुंबीयांनी केलं आहे. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुजाऱ्यासह चार लोकांना अटक केली आहे. (Delhi Rape Case Twitter removed Rahul Gandhi tweet shared the photo of Delhi rape victim parents)

संबंधित बातम्या:

राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते थेट ‘किसान संसद’ला, कृषी कायद्यांविरोधात एकजूट

‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?’, राऊतांनी चंद्रकांतदादांच्या दुसऱ्या नसेवर बोट ठेवलंच!

चाकणकरांची सून म्हणून आली आणि राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष झाली! कसा आहे रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रवास?

(Delhi Rape Case Twitter removed Rahul Gandhi tweet shared the photo of Delhi rape victim parents)

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.