AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्याच्या नशेत विमानात एअर होस्टेसशी छेडछाड, कॅप्टनला मारहाण, दोघांना अटक

आरोपींनी आपण राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. त्यातील एक जण एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची खास व्यक्ती असल्याचा दावा करतोय. रात्री उशिराच फ्लाइटच्या कॅप्टनने याप्रकरणी लेखी तक्रार केली.

मद्याच्या नशेत विमानात एअर होस्टेसशी छेडछाड, कॅप्टनला मारहाण, दोघांना अटक
Image Credit source: Google
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 09, 2023 | 9:54 AM
Share

नवी दिल्ली : इंडिगो एअर लाईनच्या विमानात दोन प्रवाशांनी एका एअर होस्टेसची छेड काढली. त्यानंतर विमानाच्या कॅप्टनला मारहाण केली. हा प्रताप करणाऱ्या तिघे जण राजकीय व्यक्तींशी संबंधित आहे. दिल्लीवरुन पटनाकडे जाणाऱ्या विमानात ही घटना घडली.

इंडिगो एअर लाईनच्या विमानात तिघे जण दारु प्राशन करुन चढले. फ्लाइटच्या आत या तरुणांनी प्रवाशांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. एअर होस्टेस आणि कॅप्टनने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना मारहाण केली.एअर होस्टेसशी छेड काढली. वैमानिकाने याबाबत पटणा विमानतळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

आरोपींची नावे  एकाचे नाव रोहित कुमार, दुसऱ्याचे नाव नितीन कुमार आणि तिसऱ्याचे नाव पिंटू कुमार आहे. तिघेही बिहारचे रहिवासी आहेत. तिघांनीही भरपूर दारू प्राशन केली होती. यापैकी पिंटू फरार झाला आहे. इतर दोघांना अटक केली आहे. आरोपींची ब्रेथ एनालाइजर टेस्ट केली गेली. त्यात त्यांना मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले.

तिघे राजकीय पदाधिकारी असल्याचा दावा आरोपींनी आपण राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. त्यातील एक जण एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची खास व्यक्ती असल्याचा दावा करतोय. रात्री उशिराच फ्लाइटच्या कॅप्टनने याप्रकरणी लेखी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी रोहित आणि नितीनला अटक करून पोलीस ठाण्यात नेले.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...