Delhi weekend curfew : अरविंद केजरीवाल ना ना करते हां कर बैठे, दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू!

राजधानी दिल्लीतही विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:04 PM, 15 Apr 2021
Delhi weekend curfew : अरविंद केजरीवाल ना ना करते हां कर बैठे, दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू!
Arvind Kejriwal

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ आता राजधानी दिल्लीतही विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केलीय. दिल्लीतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. केजरीवाल यांनी घेतलेल्या निर्णयानुसार दिल्लीमध्ये शुक्रवारी रात्री 10 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 6 पर्यंत हा विकेंड कर्फ्यू लागू असणार आहे. (CM Arvind Kejriwal’s decision to impose a weekend curfew in New Delhi)

अत्यावश्यक सेवासंबंधी लोकांसाठी कर्फ्यू काळात खास पास दिले जातील. मॉल, व्यायामशाळा, स्पा आणि ऑडिटोरियम या काळात बंद राहतील. चित्रपटगृह 30 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यात येतील. लोकांना रेस्टॉरंट्समध्ये बसून जेवण करता येणार नाही. फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी असेल, अशी माहिती केजरीवाल यांनी दिलीय.

नायब राज्यपालांसोबत चर्चेनंतर निर्णय

दिल्लीतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यबाल अनिल बैजल यांच्यासोबत सकाळी 11 वाजता बैठक घेतली. त्यानंतर केजरीवाल यांनी दुपारी 12 वाजता केजरीवाल यांनी आरोग्यमंत्री, दिल्लीचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन विकेंड कर्फ्यूचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्य माहितीनुसार दिल्लीतील रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता नाही. आजही दिल्लीत 5 हजार बेड शिल्लक असल्याचा दावा केजरीवालांनी केलाय.

24 तासांत 17 हजार 282 नवे कोरोना रुग्ण

राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत 17 हजार 282 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतल कोरोनाचा संसर्गाची टक्केवारी वाढून 15.92 टक्क्यांवर पोहोचली आहे. संसर्गाची टक्केवारी वाढण्यासाठी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही 100 च्या वर गेली आहे. बुधवारी 104 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मंगळवारी 13 हजार 468 नवे रुग्ण आढळून आले होते. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ज्या प्रमाणात वाढत आहे. त्याच प्रमाणात मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

24 तासांत 746 कंटेन्मेंट झोन

दिल्लीत जवळपास सर्वच भागात कंटेन्मेंट झोनची संख्या वेगाने वाढतेय. गेल्या 24 तासांत पूर्ण दिल्लीमध्ये 746 कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले आहेत. यावेळी कोरोनाचा संसर्ग दिल्लीतील पॉश असलेल्या भागातही पाहायला मिळतोय. दक्षिण दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढतोय. तिथे गेल्या 24 तासांत सर्वाधिक 169 कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Corona Update: अरे देवा! देशातील कोरोना रुग्णावाढीचा वेग 10 दिवसांत दुप्पट; गेल्या 24 तासांत 2,00,739 नवे रुग्ण

Corona Vaccine : देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही, रेमजेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचे आदेश- डॉ. हर्षवर्धन

CM Arvind Kejriwal’s decision to impose a weekend curfew in New Delhi