AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Demonetization: लक्ष्मण रेषेच्या आत राहून करणार नोटबंदीचा तपास- सुप्रीम कोर्ट

2016 मध्ये घेतल्या गेलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदाच मोठा निर्णय घेतला आहे. काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

Demonetization: लक्ष्मण रेषेच्या आत राहून करणार नोटबंदीचा तपास- सुप्रीम कोर्ट
नोटबंदी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 12, 2022 | 10:28 PM
Share

नवी दिल्ली,  नोटाबंदी (Demonetisation) प्रकरणावर सुनावणी करताना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की या प्रकरणातील सरकारच्या धोरणात्मक निर्णयांच्या न्यायालयीन पुनरावलोकनाबाबत ‘लक्ष्मण रेखा’ची पूर्ण माहिती आहे, मात्र हा निर्णय केवळ अर्थव्यवस्थेसंदर्भातील मुद्दा होता की आणखी काही हे तपासण्यासाठी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.  सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 9 नोव्हेंबर 2022 ही तारीख निश्चित केली आहे. पंतप्रधान मोदींनी अचानक केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर 80 टक्के नोटा निरुपयोगी करण्याच्या घटनात्मक वैधतेला याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.

ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी म्हणाले की, नोटाबंदीशी संबंधित कायद्याला जोपर्यंत योग्य दृष्टिकोनातून  आव्हान दिले जात नाही, तोपर्यंत हा मुद्दा भरकटत राहील. त्यामुळे यात तर्क सिद्ध करण्यासाठी  प्रकरणाची तपासणी करणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नोटाबंदी कशी झाली, याची चौकशी व्हायला हवी

500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला प्रतिसाद देण्यासाठी केंद्र सरकारने उत्तर तयार ठेवावे असे न्यायालयाने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी उशिरा केलेल्या भाषणात अचानक नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा सर्व नोटांपैकी 80 टक्क्यांहून अधिक नोटा चलनात होत्या याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. हा उपाय भ्रष्टाचारविरोधी होता, या प्रकरणात सरकारला प्रतिक्रिया द्यावी लागेल. याबाबत केंद्र आणि रिझर्व्ह बँक या दोघांनीही आपली उत्तरे दाखल करावीत.

बंदीनंतर काही दिवसांतच अनेकांनी चलनी नोटा कालमर्यादेत बदलल्याशिवाय निरुपयोगी ठरविण्याच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, परंतु हा मुद्दा सुनावणीसाठी घेण्यात आला. घोषणेच्या एका महिन्यानंतर, डिसेंबर 2016 मध्ये ते प्रथम पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले गेले.

नोटबंदीचा कायदा काय म्हणतो?

डिनोमिनेशन बँक नोट कायदा अर्थात डिमोनिटायझेशन म्हणजेच नोटबंदी कायदा सन 1978 मध्ये मंजूर करण्यात आला. मोठ्या रक्कमेच्या नोटा व्यवहारात अस्तित्वात राहिल्या तर त्याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार असतील तर जनहितासाठीच या कायद्याचा वापर करता येतो. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी यशस्वी ठऱला की अपयशी ठरला यावर दोन्ही बाजू सहमत नाहीत त्यामुळे या प्रकरणाची तपासणी करणं आवश्यक आहे.

आम्हाला आमची ‘लक्ष्मण रेषा’ अर्थात मर्यादा काय आहे हे नेहमीच माहित असतं. परंतु नोटाबंदी कोणत्या पद्धतीनं केली गेली हे तपासावं लागेल. यासाठी आम्हाला आधी वकिलांचं म्हणणं ऐकावं लागेल,” न्या बी. आर. गवई, ए. एस. बोपण्णा, व्ही. रामसुब्रमण्यम आणि बी. व्ही. नागरथना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने  हे मत मांडले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...