Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, 12 वर्षात मोदी सरकारमध्ये पहिल्यांदा असं घडलं
Dharmendra Pradhan Resignation : दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का आहे. कारण मागच्या 12 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं आहे. मोदी सरकारमधील एका मंत्र्याला आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. आंदोलनामुळे राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान मोदी सरकारमधील पहिले मंत्री ठरले आहेत. याआधी प्रकृती किंवा अन्य कारणांमुळे मोदी सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. पण कुठल्या आंदोलनामुळे एका मंत्र्याने राजीनामा देण्याची ही पहिली वेळ आहे. हे मोदी सरकारचं अपयश आहे.
आमच्या सरकारमध्ये राजीनामा होत नाही असं भाजप नेते म्हणत होते. पण आता एका मंत्र्याला जनतेच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. ही नामुष्की आहे. मागच्या महिन्याभरापासून दिल्लीतल्या जंतर-मंतरवर आंदोलन सुरु होतं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. त्यानंतरही सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेने राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरु राहिल असं म्हटलं होतं. अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने आंदोलनाला मोठ यश मिळालं आहे.
तेव्हा या आंदोलनाबद्दल सहानुभूती वाढली
सोमवारी सीजेपीने संसदेवर मार्च काढला होता. त्यावेळी या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सगळीकडे ही दृश्य आल्यानंतर या आंदोलनाबद्दल सहानुभूती वाढली. लोकांचा पाठिंबा वाढला. आधी राजकीय नेते आंदोलनस्थळी भेट देत होते. पण विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर समाजातून मोठा पाठिंबा या आंदोलनाला मिळाला. अनेक सेलिब्रिटी यावर व्यक्त झाले. अखेर वाढत्या पाठिंब्यामुळे सरकारवरील दबाव वाढत गेला. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सर्वोच्च न्यायायलयाच्या सरन्यायाधीशांच्या एका कमेंटमधून हा पक्ष जन्माला आला होता.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी हे आंदोलन सुरूच राहणार आहे. दीपके यांच्या आणखी 2 मोठ्या मागण्या आहे. जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे.
