धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया, थेट सीजेपीवर हल्ला; आरोपांनी खळबळ

माजी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत 'कॉकरोच जनता पार्टी' आणि राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. आंदोलनाच्या हेतूवर संशय व्यक्त करत त्यांनी लोकशाही प्रक्रिया अस्थिर करण्याचे सुनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप केला. राहुल गांधी जनादेशाचा अपमान करत लोकशाही संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे प्रधान म्हणाले.

धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया, थेट सीजेपीवर हल्ला; आरोपांनी खळबळ
dharmendra pradhan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 3:30 PM

माजी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कॉकरोच जनता पार्टीवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत प्रधान यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या हेतूवरच संशय व्यक्त केला आहे. देशहित, व्यवस्थेतील बदल आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या नावाने आंदोलन करणाऱ्यांचा आता खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. धर्मेंद्र प्रधान हे अचानक अ‍ॅक्टिव्ह झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांणा उधाण आलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवरून ही टीका केली आहे. देशहित, व्यवस्था परिवर्तनाचे दावे आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या नावाने आंदोलन सुरू झालं. आता त्यांचं खरं चारित्र्य समोर आलं आहे. हे कुणापासूनही लपून राहिलेलं नाही. उघडपणे सत्ता परिवर्तन आणि बांगलादेशातून प्रेरणा घेतल्याचं बोललं जात आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली देशात अराजकता पसरवण्याचं काम सुरू आहे. राजकीय व्यवस्था अस्थिर करण्याचं हे सुनियोजित षडयंत्र आहे, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

Loading...

विदेशी शक्तीच्या बळावर सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांनी भारतात केवळ लोकशाही प्रक्रियेतूनच सत्ता परिवर्तन होतं हे ध्यानात ठेवलं पाहिजे. देशातील जनता अशा अलोकतांत्रिक विचाराला कधीच स्वीकारणार नाही, असंही प्रधान यांनी सुनावलं आहे.

 

राहुल गांधींवर हल्लाबोल

या पोस्टमधून प्रधान यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढवला आहे. राहुल गांधी वारंवार जनतेच्या जनादेशाचा अवमान करत आहेत. निवडणुकीतून मनासारखा निकाल येत नसल्याने आता निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांवरच अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. राजकीय स्वार्थासाठी वारंवार लोकांना त्रास देणं हाच काँग्रेसचा उद्देश आहे. याच विचारधारेने देशातील लोकांच्या अधिकारांना चिरडलं गेलं आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.

जनादेशाचा अपमान नको

संविधान हातात घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधींना जनतेने वारंवार नाकारलं आहे. त्यानंतरही सत्तेच्या लालसेपोटी राहुल गांधी जनादेशाचा अपमान करत आहेत. संवैधानिक संस्थांवर प्रश्न निर्माण करून लोकशाहीच्या मर्यादांना नख लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुलजी, लोकशाहीबाबतचा तुमचा दृष्टीकोण अत्यंत लज्जास्पद आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us