… तर नवऱ्याने दुसरीकडे राहावे : कोर्ट

सामाईक घरावर पती-पत्नी दोघांचाही समान हक्क असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

... तर नवऱ्याने दुसरीकडे राहावे : कोर्ट
व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या मेसेजना अ‍ॅडमिन जबाबदार नाही
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 2:01 PM

मुंबई : विभक्त झालेल्या किंवा वेगळ्या राहिलेल्या पत्नीला घरभाडे देणे म्हणजे न्याय झाला, असे म्हणता येणार नाही. संसार करताना जर पत्नीशी पटत नसेल, तर पतीनेही दुसरीकडे भाड्याच्या घरात राहण्यास काय हरकत आहे?, असे महत्त्वपूर्ण मत दिंडोशीतील सत्र न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना नोंदवले आहे. सामाईक घरावर पती-पत्नी दोघांचाही समान हक्क असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे (Dindoshi Family court decision on husband-wife separation).

एका 45 वर्षीय महिलेने तिचा पती तिला सामाईक घरात राहायला देत नाही, असा आरोप करत दिंडोशी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. तिच्या याचिकेवर न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्णय दिला होता. त्या निर्णयाला तिने सत्र न्यायालयात आव्हान दिले. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी नुकताच निकाल दिला.

या प्रकरणात पत्नीने पाटीवर हल्ला केल्याच्या कारणावरून पत्नीला घरात प्रवेश नाकारला जात होता. मात्र, या एका कारणावरून पत्नीला सामाईक घरामध्ये प्रवेश करण्यास रोखले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाशिष बघेले यांनी निर्णय देताना नोंदवले. तसेच, याचिकाकर्त्या महिलेला सामाईक घरामध्ये प्रवेश देण्यात यावा, असा आदेश नायायालयाने पतीला दिला आहे (Dindoshi Family court decision on husband-wife separation).

महिलेचे आरोप

तक्रारदार महिलेने पती विरोधात कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली होती. ‘पतीने मला घराबाहेर काढले. माझ्या दोन लहान मुलांना भेटू दिले जात नाही, या प्रकरणी मला पोटगी मंजूर करण्याबरोबरच घरामध्ये राहण्यास परवानगी द्या’, अशी विनंती महिलेने केली होती. तिच्या या याचिकेवर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला दरमहा दोन हजारांची पोटगी आणि पाच हजारांचे घरभाडे मंजूर केले होते. मात्र, तिला सामाईक घरामध्ये राहण्यास परवानगी नाकारली होती.

पुढे न्यायलय म्हणाले, ‘पती-पत्नीमध्ये खटके उडाल्यानंतर घर सोडून गेलेल्या पत्नीला स्वातंत्र्य राहण्यासाठी घरभाडे दिले जात असेल, तर पती स्वतःच घर सोडून स्वतंत्र ठिकाणी भाड्याने राहायला का जाऊ शकत नाही? केवळ महिलेला घराबाहेर स्वतंत्र राहण्यासाठी घरभाड्याची रक्कम देणे, म्हणजे न्याय नव्हे’, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी म्हटले आहे.

(Dindoshi Family court decision on husband-wife separation)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.