G20 Summit : उद्योग जगत G20 च्या प्लॅटफॉर्मवर, डिनर डिप्लोमसीत शोधणार व्यापाराची संधी

G20 Summit : दिल्लीमधील आयोजीत G20 संमेलनात उद्योग जगताचा पण राबता असेल. गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यासह देशातील दिग्गज उद्योगपती डिनर डिप्लोमसीद्वारे त्यांच्या उद्योगासाठी संधी शोधतील.

G20 Summit : उद्योग जगत G20 च्या प्लॅटफॉर्मवर, डिनर डिप्लोमसीत शोधणार व्यापाराची संधी
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 2:48 PM

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : जी-20 संमेलनात (G20 Summit) देशातील दिग्गज व्यावसायिक, उद्योजक सहभागी होत आहे. जगातील दिग्गज अर्थव्यवस्था एकत्र येत असल्याने भारतासाठी ही मोठी संधी आहे. भारतात होणारे बदल या संमेलनात दाखविण्यात येत आहे. बदलत्या भारताचे चित्र संपूर्ण जगाला दिसत आहे. जगात मंदीचे वार वाहत असताना भारत घेत असलेली झेप सर्वांसाठी थक्क करणारी आहे. यामध्ये भारतीय उद्योग जगत पण मागे नाही. त्यांचा पण राबता या संमेलनात दिसून येत आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह उद्योग जगतातील 500 पेक्षा अधिक उद्योजक या संमेलनाला हजेरी लावतील. डिनर डिप्लोमसीतून (Dinner Diplomacy) ते उद्योगांसाठी नव्या संधी शोधतील. इतर देशात त्यांच्या विस्ताराची चाचपणी करतील. तर इतर देशांतील उद्योजक, कंपन्यांना भारतीय कंपन्या, उद्योजक यांच्याशी संवाद साधता येईल. त्यामाध्यमातून मोठी उलाढाल होण्याची संधी आहे.

जगातील नेते लावतील हजेरी

चीनच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या नाजूक आहे. ही सोन्यासारखी संधी भारत इनकॅश करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जी-जी-20 हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या संमेलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden), इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक (British PM Rishi Sunak), सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान, जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि इतर दिग्गज नेते सहभागी होत आहे. तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (China President Xi Jinping) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) हे दोघेही या समेंलनात उपस्थित नसतील.

हे सुद्धा वाचा

हे दिग्गज होतील सहभागी

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार या संमेलनात मुकेश अंबानी, गौतम अदानी, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, सुनील मित्तल, कुमार मंगलम आणि इतर अनेक दिग्गज उद्योगपती सहभागी होतील. या संमेलनात जवळपास 500 उद्योगपती सहभागी होणार आहे. देशाचे उद्योग जगत या प्लॅटफॉर्मवर दिसेल.

दोन दिवस संमेलन

हे संमेलन दोन दिवस चालेल. नवी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी 20 संमेलन होत आहे. दिल्लीतील प्रगती मैदानात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन स्थळी या संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. या संमेलनाच्या ठिकाणाला भारत मंडपम असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी जगातील दिग्गज नेते उपस्थित असतील. यामाध्यमातून भारताची मोठी छाप पडेल. भारताला त्याचा मोठा फायदा होईल.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.