ओमिक्रॉनचा धसका! उत्तर प्रदेशात रॅलीवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला, थेट कोर्टाचं मोदींना आवाहन

देशात सध्या ओमिक्रॉनचे संक्रमण वाढत आहे. त्यातच अनेक राज्यांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. यावरून हायकोर्टनं मोदींना रॅलींवर बंदी लावण्याचे तसेच आता होणारी निवडणूक तुर्तातास टाळण्याचे आवाहन केले आहे.

ओमिक्रॉनचा धसका! उत्तर प्रदेशात रॅलीवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला, थेट कोर्टाचं मोदींना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 11:58 PM

अलाहाबाद : उत्तप्रदेशात रॅलीवर बंदी घाला असे अलाहाबाद हायकोर्टाचे नमूद केले आहे. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांचे काय होणार? अस प्रश्न आता सर्वांनाच पडाला आहे. देशात सध्या ओमिक्रॉनचे संक्रमण वाढत आहे. त्यातच अनेक राज्यांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. यावरून हायकोर्टनं मोदींना रॅलींवर बंदी लावण्याचे तसेच आता होणारी निवडणूक तुर्तातास टाळण्याचे आवाहन केले आहे.

अलाहाबाद हायकोर्टाने नेमकं काय म्हटले आहे?

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका जसा जगाला आहे, तसाच भारतालाही आहे. उत्तर प्रदेश हायकोर्टात न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठासमोर एका जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी कोर्टातील गर्दी पाहून कोर्टाने मोदींना हे आवाहन केले आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅली आणि सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कोर्टाने म्हटले आहे की, निवडणुकीचा प्रचार टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करावा. तसेच मोदींनी निवडणुका तहकूब करण्याबाबतही विचार करावा असे मतही नोंदवले आहे.

लसीकरण अभियानावरून मोदींचे कौतुक

या खंडपीठाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेवरून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, विशाल लोकसंख्या असलेल्या या देशात पंतप्रधानांनी लसीकरण अभियान जोमाने चालवले आहे. कोर्ट याचे कौतुक करत आहे. त्याचबरोबर हायकोर्ट ठोस पावले उचलून प्रचासभा आणि रॅलींवर बंदी घालण्याचेही आवाहन करत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर कोर्टाने जीव आहे तर जग आहे, असेही म्हटले आहे.

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव वाढला! मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक, राज्यात पुन्हा कडक निर्बंध?

Solapur : सोलापूर ड्रनेज दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, गुदमरून 4 जणांचा मृत्यू

Omicron Variant : नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा राज्यांना सल्ला, नाईट कर्फ्यू लागणार?

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.