वाळु उपशावरुन वाद, रस्ता अडवून फॉर्च्यूनर पेटविली, भाजपा नेत्यासह तिघांचा भाजून मृत्यू

प्राथमिक तपासात वाळू उत्खननावरून दोन्ही गटामध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजता दोन्ही गट एकमेकांसमोर आले, ज्यातून जोरदार ही हाणामारी झाली.

वाळु उपशावरुन वाद, रस्ता अडवून फॉर्च्यूनर पेटविली, भाजपा नेत्यासह तिघांचा भाजून मृत्यू
BJP leader killed Chhattisgarh
| Updated on: Jun 18, 2026 | 10:59 PM

छत्तीसगड येथील कोरिया जिल्ह्यात रेती उत्खनन करण्यावरुन सुरु असलेल्या वादाचे पर्यावसण अचानक हिंसक हल्ल्यात झाले. सोनहत पोलीस ठाणे क्षेत्रातील नौगई गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण भागात दहशत पसरली आहे. वाळु उपशावरुन इतके वाद झाले की एका फॉर्च्युनर कारला आग लावण्यात आल्याने तीन लोकांना मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतामध्ये भाजपा नेते भरत सिंह उर्फ लल्ला सिंह आणि वीरेंद्र सिंह यांचा समावेश आहे. नागेंद्र सिंह हे देखील ८० टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचा वातावरण तयार झाले आहे.

नौगई गावात रेतीचा उपसा करण्यावरुन दोन गटात अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. एक गट भरत सिंह उर्फ लल्ला सिंह यांच्या नेतृत्वा खाली काम करत होता. तर दुसरा गट मनोज त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित आहे. दोन्ही गटात एकमेकांविरोधात वाद आणि तक्रारी सुरु होत्या. घटनेच्या आधी देखील दोन्ही गटात तणाव निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री वाद वाढल्यानंतर आरोप आहे की मनोज त्रिपाटी गटाच्या लोकांना रस्ता अडवून फॉर्च्युनर कारला घेरले. या वाहनात भरत सिंह उर्फ लल्ला सिंह आणि त्याचा शिक्षक भाऊ नागेंद्र सिंह, वीरेंद्र सिंह सह अन्य लोक प्रवास करत होते.

वाहन लॉक झाल्याने अडकले…

फॉर्च्युनर वाहनला ट्रकने टक्कर मारली आणि त्याला आग लावण्यात आली असा आरोप केला जात आहे. वाहन लॉक झाल्याने त्यात बसलेले लोक वेळीच बाहेर पडू शकले नाहीत आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पोहचले. या घटनेत भरत सिंह उर्फ लल्ला सिंह याचा घटनास्थळी मृत्यू झाला. गंभीररित्या भाजलेल्या वीरेंद्र सिह यांचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. अन्य जखमींना आधी अंबिकापूर मेडिकल कॉलेजला रेफर केले नंतर त्यांची स्थिती बिघडल्याने त्यांना रायपूरला हलवण्यात आले.

तिघा आरोपींना अटक

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहचले. आयजी दीपक झा यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांनी नऊ आरोपींवर या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चौघांना अटक करण्यात यश आले आहे. तर उर्वरित लोकांचा शोध सुरु आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये अक्षत त्रिपाठी, विशाल त्रिपाठी, सत्यप्रकाश त्रिपाठी आणि मन्नू त्रिपाठी यांचा समावेश आहे.

या घटनेसंदर्भात राजकीय प्रतिक्रीया देखील समोर आली आहे.आमदार भैयालाल राजवाडे यांनी या घटनेवर दुख व्यक्त केले आणि कोरिया जिल्ह्यातील इतिहासात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही गटात आधीही वाद झाले होते. एका गटाने गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. आमदार गुलाब कमरो यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.

परिसरात तणावपूर्ण परिस्थिती

फॉर्च्युनर गाडीला आग कशी लागली याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी खून आणि खुनाचा प्रयत्न यासह गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेश चौबे यांनी सांगितले. या संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि अवैध खाणकामाशी संबंधित वादांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत असून परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.

 

 

 

Follow Us