दसरा, दिवाळीचे रेल्वे तिकिटाचे टेन्शन विसरा, तिकीट मिळणार फटाफट, कारण रेल्वे चालवणार 6000 स्पेशल ट्रेन

Special Trains List: 108 रेल्वेमध्ये अतिरिक्त जनरल कोच जोडले गेले आहे. 12,500 नवीन कोच बनवण्यास परवानगी दिली आहे. ते पुढील एक, दोन वर्षांत विविध ट्रेनला जोडले जाणार आहे. यावर्षी सणांमुळे आतापर्यंत 5,975 विशेष रेल्वे सोडणे निश्चित केले आहे.

दसरा, दिवाळीचे रेल्वे तिकिटाचे टेन्शन विसरा, तिकीट मिळणार फटाफट, कारण रेल्वे चालवणार 6000 स्पेशल ट्रेन
Railway
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 6:22 PM

Special Trains List: दसरा आणि दिवाळीत गावी जाणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे या दिवसांचे तिकीट तीन महिन्याआधीच अनेक जण आरक्षित करुन ठेवतात. परंतु अनेकांना रेल्वेचे तिकीट मिळत नाही. त्यामुळे खूप जास्त पैसे भरुन खासगी बस वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. आता भारतीय रेल्वेने या लोकांसाठी स्पेशल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी आणि छट पुजासाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. तब्बल 6000 स्पेशल ट्रेन रेल्वे चालवणार आहे.

मागील वर्षापेक्षा यंदा जास्त ट्रेन

भारतीय रेल्वेने रोज एक कोटीपेक्षा जास्त जण प्रवास करतात. रेल्वेने आगामी सण, उत्सव पाहून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोंबर महिन्यात येणारा नवरात्र, दसर, नोव्हेंबर महिन्यात येणारी दिवाळी, छठ पूजा आणि नाताळच्या सुट्या यामुळे विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, यावर्षी सणांमुळे आतापर्यंत 5,975 विशेष रेल्वे सोडणे निश्चित केले आहे. मागील वर्षी या विशेष रेल्वेची संख्या 4,429 होती. या विशेष रेल्वेंमुळे एक कोटीपेक्षा जास्त लोकांना आपल्या घरी जाण्याची सुविधा मिळणार आहे.

108 रेल्वेमध्ये अतिरिक्त जनरल कोच

दुर्गा पूजा 3 ऑक्टोंबरपासून सुरु होत आहे. दिवाळी 31 पासून सुरु होणार आहे. 7 आणि 8 नोव्हेंबरला छठ पुजा होणार आहे. यामुळे विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहे. मागणी वाढल्यास विशेष ट्रेनची संख्या वाढू शकते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच 108 रेल्वेमध्ये अतिरिक्त जनरल कोच जोडले गेले आहे. 12,500 नवीन कोच बनवण्यास परवानगी दिली आहे. ते पुढील एक, दोन वर्षांत विविध ट्रेनला जोडले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांना रेल्वेत आरक्षित तिकीट मिळणार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सला द्यावे लागणारे गडगंज भाड्यातून त्यांची सुटका होणार आहे. त्यांची आर्थिक बचत होणार आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....