AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानात तिकीट घेतल्यानंतरही पसंतीच्या आसनासाठी पैसे द्यावे लागतात? काय आहे नियम…

विमानाने प्रवास करणे आता गरजेचे झाले आहे. विमानाचा प्रवास महाग झाला असला तरी लांबचा आणि विशेषत: परदेशातील प्रवास विमानाने करावा लागतो. विमानात प्रवास करताना अनेकांना वाटते की स्पेशल आसनांसाठी अतिरिक्त चार्ज द्यावा लागतो का ? असा प्रश्न अनेकांना पडतो. नेमकी काय स्थिती हे पाहूयात..

विमानात तिकीट घेतल्यानंतरही पसंतीच्या आसनासाठी पैसे द्यावे लागतात? काय आहे नियम...
flight seat rules
| Updated on: Jun 11, 2026 | 8:22 PM
Share

जर तुम्ही कधी विमानाची तिकीट बुक केली असेल तर कदाचित तु्मच्याही मनात एक प्रश्न नक्की आला असेल की तिकीटाचे भाडे भरल्यानंतर एअरलाईन कंपनी तुमच्याकडे पसंतीचे आसन निवडण्याचे वेगळे पैसे मागते का ? यामुळे अनेक जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल पसंतीच्या सीटचे पैसे देणे गरजेचे आहे का ? आणि जर पैसे दिले नाही तर सीट मिळणार नाही ? काय नेमका नियम असतो ते पाहूयात…

जेव्हा तुम्ही विमानाची तिकीट खरेदी करता. तेव्हा त्यात तुमचा प्रवासाचा परवाना आणि आसन दोन्हीचा समावेश असतो. मात्र, जर तुम्हाला तुमच्या पसंदीचे आसन हवे असेल तर मात्र तुमच्याकडून अतिरिक्त पैसे घेतले जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही विमानाचे तिकीट खरेदी करता, तेव्हा त्या तिकीटातच आसन त्यावेळी जे अव्हेलबल आहे ते दिले जाते. म्हणजे एअरलाईन तुमच्या आसनाची तजवीज केल्या शिवाय तुमच्याकडून तिकीटाचे पैसे आकारणार नाही. तुम्ही तुमची सिट निवडलेली नसेल तर तुम्हाला आपोआप उपलब्ध असलेले एक आसन अलॉट केले जाते. यावर कोणताही अतिरिक्त भार आकारलेला नसतो. मात्र, आसन तुम्ही तुमच्या पसंतीनुसार निवडलेले असेल तर मात्र, तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागतात.

पसंदीच्या आसनाचे पैसे का ?

वास्तविक, एअरलाईन्स काही खास आसनांना, ‘पसंतीच्या सीट’ वा ‘प्रेफरेंशियल सीट’ म्हणून विकते. यात विंडो सिट, पुढच्या रांगेची सीट वा जास्त लेग रुम असणारी आसने आणि इमर्जन्सी एक्झिटच्या शेजारची आसने यांचा समावेश असतो. जर तुम्ही तुमच्या पसंतीची एखादी खास सिट आरक्षित करु इच्छीत असाल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात.

जर तुम्ही तुमचे आसन निवडलेले नसेल तर एअर लाईन उपलब्ध आसनांपैकी कोणतीही आसन देऊ शकते. अनेकदा प्रवाशांचा विंडो सिट देखील अतिरिक्त पैसे न देता मिळू शकते. तर कधी-कधी मधली सिट देखील मिळू शकते.

आसनांसाठी एक्स्ट्रा फी घेण्याचा नियम काय ?

अलिकडच्या वर्षात सीट सिलेक्शन फी संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर भारताच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) एअरलाईन्सच्या सीट वाटप प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेच्या ध्यान राखण्याचे निर्देश दिले आहेत. DGCA च्या नियमांनुसार एअरलाईन्सच्या एकूण आसनांपैकी कमीत कमी ६० टक्के हिस्सा विना अतिरिक्त शुल्काशिवाय मोफत द्यायचा असतो. तसेच संपू्र्ण कुटुंबाला वा एकच PNR वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकत्र बसवण्यावर जोर दिला आहे.

यासाठी पुढच्या वेळी फ्लाईट तिकीट बुक करताना घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला स्पेशल सीटची गरज नसेल तर विमानात प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याची बिल्कुल गरजेचे नाही. एअरलाईन्स तुमच्या प्रवासासाठी आसन देणे बंधनकारक आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...