जागतिक महिला दिन विशेष : पहिला महिला दिन कधी साजरा करण्यात आला?

मुंबई : स्वतंत्र भारतात तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल महिलांची प्रगती आणि त्यांच्या अधिकारांवर बोलताना. तसेच त्यांचा सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी महिला दिवस आणि जागतिक महिला दिवस साजर केला जातो. 8 मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिवस साजरा केला जातो. चला पाहूया 8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा का केला जातो. सर्वात पहिला …

जागतिक महिला दिन विशेष : पहिला महिला दिन कधी साजरा करण्यात आला?

मुंबई : स्वतंत्र भारतात तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल महिलांची प्रगती आणि त्यांच्या अधिकारांवर बोलताना. तसेच त्यांचा सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी महिला दिवस आणि जागतिक महिला दिवस साजर केला जातो. 8 मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिवस साजरा केला जातो. चला पाहूया 8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा का केला जातो.

सर्वात पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरवात 28 फेब्रुवारी 1909 रोजी करण्यात आला. महिला दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघात एक थीम तयार करण्यात आली होती. जागतिक महिला दिनाची पहिली थीम सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर ठेवली होती. विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी जागतिक महिला दिवस साजरा करताना एक विशेष थीम बनवण्यात येते. यावर्षी महिला दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या थीमचे नाव ‘BalanceforBetter’

आज महिला स्वत:ला चांगल्या प्रकारे व्यक्त करु शकतात. मात्र पहिले असे नव्हते. पूर्वीच्या महिलांना ना शिक्षण, ना नोकरी आणि मतदान करण्याचा अधिकार होता. मात्र 1908 मध्ये 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरत एक मोर्चा काढला होता. मतदानाचा अधिकार, कमी तासाची नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या तीन प्रमुख गोष्टींच्या मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात आला होता.

1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने एक घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिला जागतिक महिला दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. यानंतर सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तसेच 19 मार्चला पहिल्यांदा ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झरलँडमध्येही जागतिक महिला दिवस साजर केला.

दोन वर्षानंतर 1913 मध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक महिला दिन सन्मान देण्यासाठी महिला सशक्तीकरण आणि मुला-मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. दरम्यान 2017 मध्ये एका सर्व्हेनुसार एक धक्कादायक अशी गोष्ट समोर आली आहे. सर्व्हेच्या माहितीनुसार महिला-पुरुषांमधील असमानता संपण्यासाठी अजून 100 वर्ष लागण्याची शक्यता वर्तवली आहे.

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन हा 8 मार्च 1943 ला साजरा झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *