कोरोनापेक्षाही मोठं संकट भारतात, डॉक्टरांची भयंकर चेतावणी, थेट फुफ्फुसांच्या…

कोरोनाने भारतात मोठा कहर केला. शाळा बंद होत्या कर्मचाऱ्यांना घरून काम दिले जात होते. हेच नाही तर यादरम्यान अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. आता नुकताच डॉक्टरांनी हैराण करणारा इशारा दिला आहे.

कोरोनापेक्षाही मोठं संकट भारतात, डॉक्टरांची भयंकर चेतावणी, थेट फुफ्फुसांच्या...
Pollution in India
| Updated on: Dec 27, 2025 | 9:02 AM

भारतातील प्रदूषण हा मोठा मुद्दा बनले आहे. दिल्ली, मुंबई यासारख्या शहरात सातत्याने प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. कोर्टाने देखील प्रदूषणाच्या मुद्यावरून सरकारला चांगलेच फटकारे. मुंबई आणि दिल्लीत हवा आरोग्यासाठी घातक बनली आहे. ब्रिटनमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या फुफ्फुस आणि हृदयविकार तज्ञांनी एक अत्यंत धक्कादायक इशारा दिला आहे, ज्यानंतर थेट खळबळ उडाली. कोरोनानंतर वायू प्रदूषण हा अत्यंत मोठा मुद्दा बनला आहे. कोरोनापेक्षाही कित्येक पट मोठे संकट वायू प्रदूषणाच्या माध्यमातून भारतासमोर उभे आहे. प्रदूषण हा भारताची सर्वात मोठी आरोग्य समस्या बनले आहे. आताच जर तातडीने उपाययोजना केल्या नाही तर परिस्थिती अधिक बिकट बनू शकते. डॉक्टरांच्या मते, उत्तर भारतातील लाखो लोकांच्या फुफ्फुसांना आधीच गंभीर इजा झाली आहे, जे अत्यंत धक्कादायक आहे.

उत्तर भारतात सातत्याने प्रदूषण वाढताना दिसत आहे. फुफ्फुसांच्या आजारांची एक मोठी लाट येत आहे.  लिव्हरपूलमधील फुफ्फुस रोगतज्ञ डॉ. मनीष गौतम यांनी स्पष्ट सांगितले की, उत्तर भारतात राहणाऱ्या लाखो लोकांची फुफ्फुसे विषारी हवेमुळे अनेक वर्षांपासून खराब झाली आहेत, ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्याप्रमाणे क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम सुरू करण्यात आले होते, आता फुफ्फुसांच्या आजारांसाठीही अशाच कार्यक्रमांची गरज आहे.

डिसेंबरमध्ये दिल्लीतील रुग्णालयांमध्ये श्वसनविकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये अनेक तरुणांची समावेश आहे. डॉक्टरांच्या मते, डोकेदुखी, हलका खोकला, घसा खवखवणे, डोळे कोरडे पडणे, वारंवार संसर्ग होणे यांसारख्या लक्षणांकडे लोक अनेकदा किरकोळ म्हणून दुर्लक्ष केले जाते. मात्र, हा अत्यंत मोठा धोका उभा आहे

बर्मिंगहॅम येथील हृदयरोगतज्ञ प्रोफेसर डेरेक कॉनोली यांनी स्पष्ट केले की, हृदयविकार खूप हळूहळू विकसित होतो. प्रदूषणाचे सूक्ष्म कण PM2.5 अदृश्य असतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही गोष्ट मान्य केली की, दिल्लीतील एकूण प्रदूषणापैकी सुमारे 40 टक्के प्रदूषण वाहतूक क्षेत्रामुळे होते. प्रदूषण असेच वाटत राहिले तर कोरोनापेक्षाही मोठी महामारी भारतामध्ये येऊ शकते.