पाकिस्तानचा घनघोर अपमान, ट्रम्प यांनी मुनीरला जागा दाखवली, तर भारतासाठी अमेरिकेतून सर्वात मोठी आनंदाची बातमी

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यापासून सातत्यानं पाकिस्तान अमेरिकेसोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता पाकिस्तानला अमेरिकेनं मोठा झटका दिला आहे, तर दुसरीकडे मात्र भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानचा घनघोर अपमान, ट्रम्प यांनी मुनीरला जागा दाखवली, तर भारतासाठी अमेरिकेतून सर्वात मोठी आनंदाची बातमी
पाकिस्तानला मोठा झटका
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 08, 2025 | 9:09 PM

पाकिस्तानकडून सातत्यानं अमेरिकेसोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी दोनदा व्हाईट हाऊसला भेट दिली आहे. तसेच जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे अशी चर्चा सुरू होती, तेव्हा देखील पाकिस्तानकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करताना ते कसे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी योग्य आहेत, हे जगाला सांगण्यात आलं. एवढंच नाही तर शांततेचा नोबेल पुरस्कार हा ट्रम्प यांनाच मिळायला पाहिजे अशी भूमिकाही पाकिस्तानने घेतली होती. एवढंच नाही तर पाकिस्तानच्या विरोधी पक्षाला विश्वासात न घेताच किंवा संसदेमध्ये कोणतीही चर्चा घडवून न आणताच पाकिस्तानच्या सरकारने परस्पर अमेरिकेसोबत रेअर अर्थ खजिन्याचा एक मोठा करार देखील केल्याची माहिती समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना खुष करण्यासाठी एवढं सगळं करून देखील आता ट्रम्प यांनीच पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांच्या या कृतीला पाकिस्तानचा मोठा अपमान समजाला जात आहे. एकीकडे ट्रम्प यांनी पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे, तर दुसरीकडे मात्र भारतासाठी अमेरिकेतून आनंदाची बातमी समोर आली आहे, त्यामुळे आता पाकिस्तानच्या जखमेवर अजूनच मिठ चोळलं जाणार आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन भारताच्या दौऱ्यावर असतानाच अमेरिकेनं आपलं राष्ट्रीय सुरक्षा धोरण (NSS) 2025 जाहीर केलं. यामध्ये चीन अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असल्याचं म्हटलं आहे. तर भारताला मात्र अमेरिकेनं आपला महत्त्वाचा भागीदार देश असल्याचं म्हटलं आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये साधी पाकिस्तानची दखल देखील घेण्यात आलेली नाहीये, यामध्ये पाकिस्तानचा कुठेच उल्लेख देखील करण्यात आलेला नाहीये. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

2017 साठी अमेरिकेनं जेव्हा आपलं राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केलं होतं, त्यामध्ये पाकिस्तानचा उल्लेख हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश म्हणून करण्यात आला होता, मात्र 2025 च्या नव्या धोरणात पाकिस्तानची नोंदच घेण्यात आलेली नाही, तेवढाच काय तो पाकिस्तानला दिलासा मिळाला आहे. मात्र पुन्हा एकदा देशाचं राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर करताना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाचं श्रेय स्वत:ला दिलं आहे. एनएसएसच्या नव्या धोरणांमध्ये देखील तसा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र भारतानं यापूर्वीही अनेकदा ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.