AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला नाही म्हणून चंदीगड PGI च्या 36 विद्यार्थीनींवर कारवाई, हॉस्टेलमधून बाहेर पडण्यास बंदी

30 एप्रिल रोजी पीएम मोदींच्या 'मन की बात'चा 100 वा भाग होता. यासाठी चंदीगडच्या नर्सिंग इन्स्टिट्यूट पीजीआयएमईआरच्या विद्यार्थ्यांनाही हा कार्यक्रम ऐकण्यास सांगितले होते. नर्सिंगचे 36 विद्यार्थी 'मन की बात' ऐकायला आले नाहीत. आता पीजीआयने त्याच्यावर कारवाई केली आहे.

'मन की बात' कार्यक्रम ऐकला नाही म्हणून चंदीगड PGI च्या 36  विद्यार्थीनींवर कारवाई, हॉस्टेलमधून बाहेर पडण्यास बंदी
| Edited By: | Updated on: May 12, 2023 | 1:00 PM
Share

चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat)  कार्यक्रमाचा 100 वा भाग न ऐकल्याबद्दल चंदीगडच्या पीजीआयने (Chadigarh PGI) नर्सिंगच्या 36 विद्यार्थ्यांना 7 दिवसांसाठी हॉस्टेल आणि PGI मधून बाहेर जाण्यास बंदी करण्यात (Outing of Nursing students Banned) आली आहे. सर्व नर्सिंग विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ ऐकावी असे लेखी आदेश पीजीआयने जारी केले होते, परंतु तृतीय वर्षाच्या नर्सिंगच्या 28 विद्यार्थ्यांनी आणि प्रथम वर्षाच्या नर्सिंगच्या 8 विद्यार्थ्यांनी ते ऐकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम न ऐकणाऱ्या विद्यार्थिनींचे बाहेर जाणे बंद केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, पीजीआय चंदीगडने एक आदेश जारी केला आहे की विद्यार्थ्यांना ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यास सांगितले होते, परंतु काही विद्यार्थ्यांनी ते ऐकले नाही. याबाबत 36 विद्यार्थिनींचे बाहेर पडणे (Outing of Nursing students Banned) 7 दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. पीजीआय चंदीगडने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

चंदिगड पीजीआयने केला आदेश जारी

पीजीआयने एक आदेश जारी केला. त्यानुसार, 30 एप्रिल रोजी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यास सांगितले होते. नियमित अभ्यासक्रम म्हणून त्यात सहभागी व्हावे या उद्देशाने ही सूचना देण्यात आली होती. कार्यक्रमाच्या आधीच्या भागात पंतप्रधान हे अवयवदानाच्या उदात्त हेतूला चालना देण्याबद्गल बोलले होते.

student

student

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनी होत्या अनुपस्थित

यावेळी काही विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकण्यास आल्या नाही व त्यांनी गैरहजर राहण्याचे काही कारणही दिले नाही. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यांना पीजीआयएमईआर प्रशासनाच्या नाराजीची माहिती दिली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.