डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

| Updated on: Jan 25, 2021 | 9:30 AM

ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. (ECI Digital Voter Card download)

डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डिजीटल मतदान ओळखपत्र (Digital Voter Card) जारी करणार आहे. डिजीटल वोटर कार्ड आज (25 जानेवारी) अधिकृतपणे जारी केले जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करु शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांच्यानंतर आता मतदान ओळखपत्रही डिजीटल स्वरुपात उपलब्ध होत आहे.  (ECI launches Digital Voter Card from 25th January know how to download)

पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी डिजीटल वोटर कार्डचे लाँचिंग

येत्या काही महिन्यांमध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड

पहिल्या टप्प्यात 25 ते 31 जानेवारी दरम्यान नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. या कालावधीमध्ये जे मतदार नव्याने नोंदणी करतील, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळेल.

मोबाईल नंबर रजिस्टर असल्यास 1 फेब्रुवारीपासून डिजीटल कार्ड

ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल, त्यांना 1 फेब्रुवारीपासून डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही, त्यांना तो निवडणूक आयोगाकडून पडताळणी करुन घ्यावा लागणार आहे.

पीडीएफ स्वरुपात मिळणार डिजीटल कार्ड

सर्व मतदारांना डिजीटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. मतदार आपले डिजीटल वोटर कार्ड डिजीलॉकर (Digilocker) मध्येही सेव्ह करुन ठेवू शकतात. (ECI launches Digital Voter Card from 25th January know how to download)

डिजीटल वोटर कार्ड कसे डाऊनलोड कराल?

  1. https://voterportal.eci.gov.in/ किंवा https://nvsp.in/Account/Login या वेबसाईटवर लॉगइन करा
  2. वेबसाईटवर आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अकाऊंट तयार करा
  3.  E-EPIC डाऊनलोड करा
  4. 25 जानेवारीला सकाळी 11.14 वाजल्यापासून ही सुविधा उपलब्ध असेल.

संबंधित बातम्या:

(ECI launches Digital Voter Card from 25th January know how to download)