AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Kejriwal : 100 कोटींचं प्रकरण, ED कडून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक, अरविंद केजरीवाल यांची संपत्ती किती ?

कथित दारू घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली. गुरूवारी रात्री केजरीवाल यांच्या अटकेची कारवाई झाली. सध्या ते ईडीच्या ताब्यात आहेत.

Arvind Kejriwal : 100 कोटींचं प्रकरण,  ED कडून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक, अरविंद केजरीवाल यांची संपत्ती किती ?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली.
| Updated on: Mar 22, 2024 | 1:33 PM
Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळा प्रकरणात चांगलेच अडकल्याचे दिसत आहे. गुरुवारी संध्याकाळी ईडीच्या पथकाने सीएम केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. सध्या ते ईडीच्या ताब्यात आहे. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून नऊ वेळा समन्स बजावण्यात आल होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून अर्ज केला होता. पण कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतरच गुरूवारी ईडीने त्यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. आज त्यांना आज स्पेशल पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तसेच आपच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची एकूण संपत्ती ही 3.44 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम म्हणून केवळ 12 हजार रुपये तर त्यांच्या पत्नीकडे 9 हजार रुपये आहेत. केजरीवाल यांच्या कुटुंबाची बँकेत 6 अकाऊंट्स असून त्यामध्ये 33.29 लाख रुपये जमा आहेत. केजरीवाल यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाहीये.

40 हजारांची चांदी आणि 32 लाखांचं सोनं

2020 च्या निवडणूकीवेळी केजरीवाल यांनी निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं, त्यातील माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीकडे 32 लाख रुपये किमतीचे 320 ग्रॅम सोने आणि 40 हजार रुपये किमतीची एक किलो चांदी होती. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे म्युच्युअल फंडमध्ये 15.31 लाख रुपये जमा आहेत. केजरीवाल यांच्या नावे कोणतेही वाहन अथवा गाडी नाही, मात्र त्यांच्या पत्नीच्या नावे 6.20 लाख रुपयांची मारुती बलेनो ही कार आहे.

1 कोटींचं आलिशान घर

हरियाणातील गुरुग्राम येथे केजरीवाल यांच्या पत्नीच्या नावे एक आलिशान घर आहे. त्यांनी हे घर 2010 साली खरेदी केले होते. 2020 मध्ये त्या घराची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये होती. 2010 साली जेव्हा हे घर विकत घेण्यात आलं तेव्हा त्याची किंमत 60 लाख रुपये होती. myneta.info नुसार, अरविंद केजरीवाल यांच्या नावावर गाझियाबाद आणि हरियाणामध्ये बिगरशेती जमीन आहे, 2020 साली त्याची किंमत 1.77 कोटी रुपये होती.

कोणतंही कर्ज नाही

दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांच्या नावावर कोणतही कर्ज नाही. त्यांनी कोणतीही बँक अथवा फायनॅन्स कंपनीकडून कोणतही पर्सनल लो लोन घेतलेलं नाही. त्याशिवाय, एलआयसी आणि एनएससी (NSC), पोस्टल बचत किंवा विमा यांसारख्या इतर कोणत्याही सरकारी योजनांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली नाही. मात्र, केजरीवाल यांच्या पत्नीच्या नावे पीपीएफ खात्यात 13 लाख रुपये जमा आहेत.

किती शिकले आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री ?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 51 वर्षांचे असून त्यांनी 1989 साली IIT खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech ची पदवी घेतली. चांदणी चौक हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची पत्नी ही निवृत्त सरकारी कर्मचारी आहे.

दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मधील कथित घोटाळ्यात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीनं आतापर्यंत मुख्यमंत्री केजरीवाल यांना 9 वेळा समन्स बजावलं.गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला ईडीनं सीएम केजरीवाल यांना पहिलं समन्स धाडलं होतं. हे समन्स प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत जारी करण्यात आलं. हे प्रकरण सुमारे 100 कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि के. कविता यांना अटक झाली आहे.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.