शरद पवार गटाची एनडीएसोबत जवळीकता, निवडणूक आयोगाविरोधातील दिल्लीतील मोर्चात पवारांचे किती खासदार पोहोचले, थेट..

Sharad Pawar NCP : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि एसआयआरविरोधात इंडिया आघाडी आक्रमक भूमिका घेत आहे. दिल्लीत मोठा मोर्चा काढण्यात आला. इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून आणि खासदारांकडून ठिय्या आंदोलन केले जात आहे.

शरद पवार गटाची एनडीएसोबत जवळीकता, निवडणूक आयोगाविरोधातील दिल्लीतील मोर्चात पवारांचे किती खासदार पोहोचले, थेट..
Sharad Pawar
| Updated on: Oct 06, 2026 | 12:06 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक झाली. दिल्लीत आज आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते उपस्थित आहेत. आकाशवाणी परिसरात विरोधकांनी ठिय्या दिलाय. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाहीत. इंडिया आघाडीतील जवळपास खासदार या मोर्चात सहभागी झालेत. काही खासदार रस्त्यावर बसून घोषणाबाजी करत आहेत तर काही खासदार बॅरिकेटवर चढले आहेत. राज्यातील खासदारही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हा मोर्चा आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची वेळ आल्याचे मोठे विधान राहुल गांधी यांनी केले. खासदार सुप्रिया सुळे या देखील या मोर्चात सहभागी झाल्या आहेत.

या मोर्चातून आम आदमी पार्टीने माघार घेतली. दुसरीकडे एनडीएसोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची जवळीकता वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार या मोर्चात सहभागी होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

Loading...

त्यातच एनडीएसोबत वाढलेली जवळीक असतानाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार या इंडिया आघाडीच्या मोर्चात सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी पूर्णपणे इंडिया आघाडीसोबत असल्याचे यामाध्यमातून स्पष्ट होतंय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आज इंडिया आघाडीकडून ब्लॉक करण्यात आला. दिल्लीत यादरम्यान घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळतंय.

दिल्लीतील या मोर्चाकडे सर्वांच्या नजरा आहेत. इंडिया आघाडीच्या मोर्चानंतर कॉकरोच जनता पार्टीही 10 ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीही आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. कॉकरोच जनता पार्टीने 10 ऑक्टोबर रोजी मोठी घोषणा केली. तरूणांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले. सीजेपीच्या पहिल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. त्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्याही राजीनाम्यासाठी सीजेपी आक्रमक होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us