कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा, सरकारची डोकेदुखी वाढली, थेट 10 ऑक्टोबरला..
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक असतानाच आता कॉकरोच जनता पार्टीने सरकारचे टेन्शन वाढवले आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून अत्यंत मोठा निर्णय घेत थेट घोषणा करण्यात आली.

कॉकरोच जनता पार्टी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहे. मुंबईत याबाबत मोठे आंदोलन करण्यात आले. दिल्लीत आज ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीत मोठा मोर्चा इंडिया आघाडीचा आहे. मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे नेते आणि खासदार या मोर्चात सहभागी झाली आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यातच आता कॉकरोच जनता पार्टीने अत्यंत मोठी घोषणा केली. सीपेजीच्या या घोषणेने सरकारचे टेन्शन चांगलेच वाढल्याचे बघायला मिळतंय. 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत एका मोठ्या आंदोलनाची घोषणा केली. सीजेपीने आंदोलनाची हाक दिली असून देशातील तरूण आणि जनरेशन झेड अर्थात जेनझी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी याबाबत माहिती दिली.
सौरव दासने एक्सवर याबाबत एक पोस्ट शेअर केली. सौरव दास यांनी लिहिले की, तरूण वर्ग आपला मतदानाचा अधिकार आणि चांगली व्यवस्था मिळवण्यातच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरेल. सौरव दास यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदार यादीतून नावे वगळल्यामुळे तरुणांच्या मतदानाच्या अधिकारांवर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
सौरव दासने बेरोजगारीचाही मुद्दा उपस्थित केला. आजचे तरुण आपल्या मतांच्या माध्यमातून व्यवस्थेत बदल घडवून आणू शकले नाहीत, तर बेरोजगारीसारख्या समस्यांवर उपाय कसे शोधले जातील? असेही त्यांनी म्हटले. विरोधक ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत, त्यातच आता जेनझी देखील रस्त्यावर उरणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच कॉकरोच जनता पार्टीकडून जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आले. नीट पेपरफुटीविरोधात हे आंदोलन करण्यात आले. सुरूवातीला या आंदोलनाला फार काही महत्व सरकारने दिली नाही. पण त्यानंतर जेनझी आक्रमक झाले आणि मोठ्या शहरात जेनझी रस्त्यावर उतरले. त्यानंतर मोठ्या दबावानंतर सरकारला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. हा मोदी सरकारमधील पहिला राजीनामा ठरला. मोठा धक्का मोदींसाठी होता.
