AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीपीई किट, आरटीपीसीआर चाचणी सक्तीची, मतमोजणीसाठी पोलिंग एजंटांना निवडणूक आयोगाची गाईडलाईन

वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जबाबदार धरले होते. (Election Commission bans victory processions on or after counting on May 2 )

पीपीई किट, आरटीपीसीआर चाचणी सक्तीची, मतमोजणीसाठी पोलिंग एजंटांना निवडणूक आयोगाची गाईडलाईन
पुद्दुचेरीतही मोदींचा करिष्मा, NDA ला सर्वाधिक जागा मिळण्याची चिन्हं
| Updated on: Apr 28, 2021 | 4:25 PM
Share

नवी दिल्ली: वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जबाबदार धरले होते. त्यानंतर येत्या 2 मे रोजी पाच राज्यांसाठी होणाऱ्या मतमोजणीसाठी काय तयारी केली, त्याचा प्लान सादर करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने कठोर ताशेरे ओढल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाला जाग आली असून आयोगाने मतमोजणीच्या दिवसासाठी गाईडलाईन जारी केली आहे. (Election Commission bans victory processions on or after counting on May 2 )

मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर काल निवडणूक आयोगाने 2 मे रोजी निकाल लागल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर कोणत्याही प्रकारची गर्दी करण्यास मज्जाव केला आहे. विजयी उमेदवार केवळ दोन लोकांना सोबत घेऊन आपल्या विजयाचं सर्टिफिकेट घेऊ शकतो, असं आयोगाने स्पष्ट केलं.

उमेदवारांनाही सक्ती

आयोगाने 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी पोलिंग एजंटसाठीही गाईडलाईन जारी केली आहे. आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय कोणत्याही पोलिंग एजंटला मतमोजणी केंद्रावर जाता येणार नाही. तसेच मतमोजणी केंद्रावर जाणाऱ्या पोलिंग एजंटला पीपीई किट घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर जाणाऱ्या उमेदवाराला त्याचं कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्रं दाखवावं लागणार आहे. तसेच त्यांचं वय 45 पेक्षा अधिक असेल तर त्याला कोरोना व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटही दाखवावं लागणार आहे. त्याने दोन डोस घेतले असतील तर त्याचं सर्टिफिकेट त्यांना दाखवावं लागणार आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने काय म्हटले?

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. याची मद्रास उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला होता.

तर मतमोजणी थांबवू

येत्या 2 मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी योग्य धोरण आखलं नाही तर आम्ही तात्काळ प्रभावाने मतमोजणी थांबवू, असा इशाराही न्यायालयाने आयोगाला दिला आहे.

तुम्ही परग्रहावर होता का?

पाचही राज्यांमध्ये हजारोंच्या निवडणूक रॅली होत असातना तुम्ही परग्रहावर होता काय? असा खरमरीत सवालही कोर्टाने निवडणूक आयोगाला विचारला. (Election Commission bans victory processions on or after counting on May 2 )

संबंधित बातम्या:

कोरोना संकटात आम्ही मूकदर्शक बनू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला 7 सवाल

लसींच्या दरांबाबत केंद्र सरकार काय करतंय?, ही राष्ट्रीय आणीबाणी नाही तर काय?; सुप्रीम कोर्टाचा सवाल

बैल गेला अन झोपा केला, हायकोर्टाने झापल्यानंतर निवडणूक आयोगाला शहाणपण, घेतला मोठा निर्णय

(Election Commission bans victory processions on or after counting on May 2 )

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.