
अमेरिकेकडून सातत्यानं भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी सुरुवातीपासूनच अमेरिकेची भूमिका आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली होती, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसाबाबत देखील काही मोठे निर्णय घेतले ज्याचा थेट फटका हा भारताला बसला आहे. अमेरिकेमध्ये रोजगारासाठी जगातील जेवढे लोक स्थलांतर करतात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांचा समावेश आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाबाबत जो शुल्क वाढीचा निर्णय घेतला त्यामुळे देखील भारताचं मोठं नुकसान झालं, दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
अमेरिकेचं एक राज्य असलेल्या फ्लोरिडाने मोठा निर्णय घेतला आहे, जे अमेरिकेमध्ये H-1B व्हिसाधारक आहेत त्यांना एक वर्ष या राज्यात नोकरी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आता याचा सर्वाधिक फटका पु्न्हा एकदा भारताला बसणार आहे. या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाहीये, मात्र लवकरच या निर्णयाची अधिकृत अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. मुळ अमेरिकन लोकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात आणि देशातील असंतोष कमी व्हावा असा या मागे उद्देश असल्याचं बोललं जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हा प्रस्ताव आता फ्लोरिडा बोर्ड ऑफ गव्हर्नर्सकडून 29 जानेवारी रोजी सादर केला जाणार आहे, त्यानंतर या प्रस्तावाला मंजूरी देण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजूर मिळाल्यानंतर पुढील एक वर्ष या राज्यात कोणत्याही एच 1बी व्हिसाधारक व्यक्तीला नोकरी मिळणार नाहीये, अमेरिकेमध्ये असलेल्या एच वन बी व्हिसाधारकांमध्ये सर्वाधिक संख्या ही भारतीय नागरिकांची असल्यामुळे याचा मोठा फटका हा भारताला बसणार आहे. दरम्यान एकीकडे भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी व्यापारी डील होणार आहे, या डील संदर्भात बोलणी सुरू असतानाच आता अमेरिकेनं हा निर्णय घेतला आहे.