भारतानं कोविडचे डोस रोखल्याचा इंग्लंडचा आरोप, सिरमनं आरोप फेटाळले, वाचा काय घडतं आहे?

| Updated on: Mar 18, 2021 | 11:20 PM

इंग्लंडला एप्रिल महिन्यात भारताकडून येणाऱ्या लसीचे 50 लाख डोस कमी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारताने कोविडचे डोस रोखल्याचा आरोप इंग्लंडकडून करण्यात आलाय.

भारतानं कोविडचे डोस रोखल्याचा इंग्लंडचा आरोप, सिरमनं आरोप फेटाळले, वाचा काय घडतं आहे?
कोविशील्ड लस
Follow us on

नवी दिल्ली : भारताकडून इंग्लंडला होणाऱ्या कोरोना लसीच्या पुरवठ्यात पुढील महिन्यात काहीशी घट पाहायला मिळू शकते. कारण, ऑस्कफर्ड आणि एस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा उशिरा होण्याची शक्यता आहे. अशावेळी इंग्लंडला एप्रिल महिन्यात भारताकडून येणाऱ्या लसीचे 50 लाख डोस कमी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारताने कोविडचे डोस रोखल्याचा आरोप इंग्लंडकडून करण्यात आलाय. त्याला सीरम इन्स्टिट्यूटने उत्तर दिलं आहे.(England accuses India of blocking supply of Covishield vaccine, Serum Institute denied the allegations)

सीरमने इंग्लडला होणारा पुरवठा रोखला?

मिळालेल्या माहितीनुसार जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये बनवल्या जाणाऱ्या या लसीचा पुरवठा रोखण्यात आला आहे. यापूर्वी स्थानिक आरोग्य संस्थांनी जारी केलेल्या एका पत्रकार म्हटलंय की नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS)ने एप्रिलमध्ये कोरोना व्हॅक्सिनचा पुरवठा कमी होऊ शकतो असं म्हटलं होतं.

सीरम इन्स्टिट्यूटने आरोप फेटाळले

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलं आहे की, ‘काही आठवड्यांपूर्वी इंग्लंडला 50 लाख डोसचा पुरवठा केला होता. भारतातील सध्यस्थिती आणि गरज पाहता बाकी डोस आम्ही नंतर पाठवू’. दरम्यान, मार्चमध्ये नियोजित योजनेनुसार मार्चमध्ये 50 लास डोसचा पुरवठा केला जाणं अपेक्षित होतं. मात्र, त्याची निश्चित वेळ ठवण्यात आली नव्हती.

दरम्यान, इंग्लंडने अपेक्षा व्यक्त केली आहे की, एप्रिलनंतर लसीचा पुरवठा वाढेल. सध्या जरी पुरवठा कमी झाला असला तरी 15 एप्रिलपर्यंत 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक आणि जुलैच्या अखेरपर्यंत सर्व वयोवृद्ध नागरिकांना पहिला डोस देण्याच्या लक्ष्यापासून आम्ही फार दूर राहणार नाही.

आधी भारताची गरज लक्षात घ्या, सीरमला निर्देश

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी आहे. ही कंपनी या वर्षी गरीब देशांसाठी कोरोना लसीचे 1 अब्ज डोस बनवणार आहे. अदर पुनावाला यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की, या लसीच्या पुरवठ्याबाबत थोडा धीर धरणं गरजेचं आहे. तसंच कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत की, भारताची मोठी गरज आधी लक्षात घेण्यात यावी, असंही पुनावाला यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, 25 हजार 833 नवे रुग्ण! कोणत्या शहरात चिंताजनक स्थिती?

Nashik Corona New Strain : नाशिककरांनो काळजी घ्या! दुबई आणि युरोपातील कोरोना स्ट्रेनचे 5 रुग्ण!

England accuses India of blocking supply of Covishield vaccine, Serum Institute denied the allegations