झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा विधानसभेला घेराव, CJP कडून प्रतिसाद नाहीच, मोठे नेत्यांनीही..

सीजेपीने देशभरात मोठे आंदोलन उभारले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभरात आंदोलन सुरू होते. आता झारखंडमध्येही विद्यार्थ्यांनी मोठा लढा सुरू केला. मात्र, या आंदोलनात सीजेपी कुठेही विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना दिसत नाहीये.

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा विधानसभेला घेराव, CJP कडून प्रतिसाद नाहीच, मोठे नेत्यांनीही..
Jharkhand movement
| Updated on: Aug 10, 2026 | 3:24 PM

कॉकरोच जनता पार्टीकडून मोठे आंदोलन देशभरात उभारण्यात आले. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले. मात्र, झारखंडच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सीजेपी सक्रिय दिसत नाहीये. या आंदोलनावर त्यांनी माैन बाळगले. अभिजीत दिपके जंतर मंतरवर सरकारकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यात सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जेपीएससी-जीएसएससी परीक्षेच्या कथित घोटाळा प्रकरणात 17 दिवसांपासून विद्यार्थ्याचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी सोमवारी विधानसभा घेरण्याचा निर्णय घेतला. सकाळी 11 वाजता विद्यार्थी विधानसभेकडे निघाले. एक एक बॅरिकेडला पार करत विद्यार्थी विधानसभेपर्यंत पोहोचले.

पोलिसांनी अखेर विद्यार्थ्यांना रोखले. यादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन करून सरकारला मागे हटण्यास भाग पाडणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी झारखंडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये शांततेच्या भूमिकेत आहे. साैरभ दास आणि आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर झारखंडच्या आंदोलनात विद्यार्थ्यांना समर्थन करणारे काहीच लिहिले नाही.

ना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही आवाहन केले नाही सरकारला. कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स अकाऊंटवरही या आंदोलनाबाबत काहीच लिहिण्यात आले नाही. आशुतोष रांका आणि साैरभ दास हे फक्त जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या पोस्ट रिशेअर करत आहेत. यासोबतच अभिजीत दिपके यांच्यासोबत कॉकरोच जनता पार्टीचे कोणतेही नेते झारखंडच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत.

या आंदोलनावर अभिजीत दिपके यांनी भाष्य केले. अभिजीत दिपके यांनी देवेंद्र नाथ महतो यांच्या मोर्चावर सहभागी होण्याबद्दल म्हटले की, झारखंडच्या प्रदर्शनकारी विद्यार्थ्यांसाठी एकजुटता. मात्र, कॉकरोच जनता पार्टीच्या मुख्य एक्स अकाऊंटवर याबाबत काहीच लिहिण्यात आले नाही. मात्र, ना कॉकरोच जनता पार्टी ना त्यांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होताना दिसत नाहीत, या आंदोलनाच्या सपोर्टमध्ये त्यांच्याकडून पोस्टही शेअर केल्या जात नाहीत. त्यामुळे आता विविध चर्चा या रंगतान दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us