AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदुस्थानमध्ये स्फोट होतच राहतात…कोणती नवीन गोष्ट सांगताय…पंजाबमधील दोन बॉम्बस्फोटावर फारुक अब्दुल्लांच्या प्रतिक्रियेने संताप

Farooq Abdullah Reaction: पंजाबमध्ये दोन स्फोट झाले. जालंधरमधील BSF मुख्यालय आणि त्यानंतर अमृतसर येथील लष्करी तळाजवळ हे स्फोट झाले आहे. त्यावरून चिंता व्यक्त होत असतानाच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांच्या वक्तव्याने संतापाची लाट उसळली आहे.

हिंदुस्थानमध्ये स्फोट होतच राहतात...कोणती नवीन गोष्ट सांगताय...पंजाबमधील दोन बॉम्बस्फोटावर फारुक अब्दुल्लांच्या प्रतिक्रियेने संताप
हिंदुस्थानमध्ये स्फोट होतच राहतात...कोणती नवीन गोष्ट सांगताय...Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 06, 2026 | 12:49 PM
Share

Farooq Abdullah reaction over Punjab Blast: पंजाबमधील मंगळवारी रात्री दोन वाजता दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाले. जालंधरमधील बीएएसएफ मुख्यालय आणि त्यानंतर अमृतसर येथील लष्करी तळाजवळ हे बॉम्बस्फोट झाले. या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. तर जागोजागी नाकाबंदी करून या स्फोटामागील हात असणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. देशभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी असंवेदनशील वक्तव्य केले. पंजाबमधील स्फोटावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी हिंदुस्थानात असे स्फोट होताच राहतात. त्यात काय नवीन सांगताय असे वक्तव्य केले. त्यावरून आता संतापाची लाट उसळली आहे. या स्फोटामुळे घाबरू नका. देशात स्फोट होणे ही काही नवीन काम नाही. देशात असे स्फोट होत राहतात. त्यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता आहे.

पंजाब सरकारवर विरोधकांचा निशाणा

या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधारी आम आदमी पक्षाला धारेवर धरले. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी चिंता व्यक्त केली. BSF मुख्यालयाजवळ झालेला स्फोट चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. इतक्या वर्दळीच्या ठिकाणी डिलिव्हरी स्कूटर लावून एखादा व्यक्ती जात असेल तर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असल्याचे हे चिन्हं आहेत. एकीकडे राज्य सरकार राष्ट्रपतींसमोर त्यांच्या आमदारांची परेड करण्यात गुंतली आहे, तर दुसरीकडे या स्फोटाची जबाबदारी घेण्यापासून केंद्र सरकारही कचरत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानेक केला आहे.

काय आहे स्फोटाच घटना?

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी 5 मे रोजी रात्री 8 वाजता जालंधर जिल्ह्यातील BSF च्या मुख्यालयाशेजारी एका स्कुटीला आग लागली. या घटनेत या परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक लोकांनी सांगितले की त्यांनी एका वाहनाचा स्फोट झाल्याचे पाहिले. मोठा आवाज झाला. फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयची स्कुटी पंजा फ्रंटियर मुख्यालयाच्या बाहेर उभी होती. त्याचवेळी जोरदार धमाका झाला.

सोशल मीडियावर समोर आलेल्या CCTV मध्ये एक संशयित दहशतवादी एका पॉलिथिन वस्तू सोडून पळाल्याचे समोर आले. त्यानंतर लागलीच जोरदार धमाका झाला. स्फोट झाल्यानंतर स्कुटी पूर्णपणे जळून खाक झाली. एक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. या धमाक्यात कुणालाही काहीच इजा झाली नाही. पण स्फोटाने परिसर हादरला आणि भिंतीना तडे गेले.

तर जालंधर नंतर अमृतसर येथील लष्कराच्या छावणीजवळ थोड्याच वेळाने दुसरा स्फोट झाला. या स्फोटातही कोणी जखमी झाले नाही. पंजाबमधील दोन्ही स्फोटाचा तपास हा NIA करत आहे. या दोन्ही घटनेनंतर लष्कर आणि पंजाब पोलीस सक्रिय झाले आहेत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि पुरावे शोधण्याचे काम सुरू असल्याचे समजते. पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे दोषींचा शोध सुरू केला आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं