AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Family Property Transfer : कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणाबाबत शासनाचा एक चांगला निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

Family Property Transfer : मालमत्तेचे हस्तांतरण म्हणजे केवळ समोरच्याकडे चाव्या सुपूर्द करणे एवढाच नसतो, त्या प्रक्रियेसाठी काही कायदेशीर पार पाडाव्या लागतात. लेखी नोंदी आणि काही नियम पाळावे लागतात.

Family Property Transfer : कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणाबाबत शासनाचा एक चांगला निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
House
| Updated on: Jul 29, 2026 | 7:37 AM
Share

महाराष्ट्र सरकारने कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कुटुंबामध्येच मालमत्तेचे हस्तांतरण विविध कारणांसाठी केले जाते. त्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना समान वाटा मिळावा, मालमत्ता नियोजन, कर बचत अशी विविध कारणं त्यामागे असतात. मालमत्तेचे हस्तांतरण म्हणजे केवळ समोरच्याकडे चाव्या सुपूर्द करणे एवढाच नसतो, त्या प्रक्रियेसाठी काही कायदेशीर पार पाडाव्या लागतात. लेखी नोंदी आणि काही नियम पाळावे लागतात. कारण कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता मालमत्ता हस्तांतरण केलं तर नंतर वाद निर्माण होऊ शकतात. कायदेशीर कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागू शकतो.

शासनाच्या महसूल विभागाने नोंदणी अधिनियम, 1908 अंतर्गत महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात तसेच मयत मुलाची पत्नी यांना निवासी किंवा कृषी मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरित केल्यास, त्या दस्तऐवजासाठी केवळ ₹२०० नोंदणी शुल्क आकारले जाईल. या निर्णयामुळे कौटुंबिक मालमत्तेचे हस्तांतरण अधिक सुलभ, किफायतशीर आणि नागरिकाभिमुख होणार आहे. तसेच, या प्रक्रियेसाठी होणारा खर्च वाचणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मालमत्तेचे हस्तांतरण कधी होऊ शकते?

मालमत्तेचे हस्तांतरण व्यक्तीच्या हयातीत किंवा मृत्यूनंतर होते. प्रत्येक प्रकरणात हस्तांतरणासाठी स्वतंत्र कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागते. योग्य पद्धत निवडल्याने आणि योग्य कागदपत्रांचा वापर केल्याने विलंब आणि न्यायालयीन अडचणी टाळण्यास मदत होते.

मालमत्ता हस्तांतरणाचे नियम काय आहेत?

मालमत्ता देणारा जो आहे, त्याने ते स्वेच्छेने दिलेले असले पाहिजे. प्राप्तकर्त्याने ती देणगी स्वीकारली पाहिजे. मालमत्ता ट्रान्सफर करता नोंदणी करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेच्यावेळी किमान दोन साक्षीदार असणे आवश्यक आहे.

मालमत्ता हस्तांतरण करताना कुठली कागदपत्रं हवी

मालमत्तेचे हस्तांतरण करताना कायद्यानुसार काही सामान्य मालमत्ता हस्तांतरण कागदपत्रे आवश्यक असतात. मूळ मालमत्ता हक्कपत्र, दोन्ही पक्षांचा ओळखीचा पुरावा, दानपत्र किंवा मृत्युपत्र, बोजा प्रमाणपत्र, मालमत्ता कराच्या पावत्या, पॅन/आधार तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो, साक्षीदाराचा तपशील

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप